Join us

मोदी सरकारकडून पहिल्या पाच वर्षांत जाहिरातींवर तब्बल ५९०९ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 8:10 PM

आरटीआयची माहिती; रेडिओ, डिस्प्लेवर सर्वाधिक खर्च

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या पाच वर्षातील कार्यकाळात विविध प्रकारच्या जाहिरातीवर तब्बल ५,९०९ कोटी ३९ लाख ५१ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. यापैकी संपलेल्या आर्थिक वर्षात त्यासाठी जवळपास बाराशे कोटी खर्च करण्यात आलेला आहे. ही आकडेवारी कोणा विरोधकांकडील नसून केंद्र सरकारच्या ब्यूरो ऑफ आउटरीच अ‍ॅण्ड कम्युनिकेशन विभागाने दिलेली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या अर्जावर ही माहिती देण्यात आलेली आहे.

गलगली यांनी गेल्या २२ मे रोजी केंद्र सरकारकडे माहिती मागविली होती. त्यावर मिळालेल्या माहितीनुसार पाच वर्षामध्ये एनडीए सरकारने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि आउटडोर मीडिया यावर एकुण ४ प्रकारात जाहिराती करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्लान, नॉन प्लान, क्लाइंट डिपार्टमेंट आणि एडवांस डिपार्टमेंट असून डिस्प्ले क्लास, रेडिओ स्पॉट आणि आउटडोर पब्लिसिटी यावर एकुण ५९०९ कोटी ३९ लाख ५१ हजार केल्याचे म्हटले आहे.

२०१४-१५ या आर्थिक वर्षात ९७९ कोटी ६६ लाख रुपये खर्च केले. दुसऱ्या वर्षात११६२कोटी ४७ लाख तर तिसºया वर्षात २५८ कोटी ३२ लाख इतका खर्च करण्यात आला होता. २०१७-१८ मध्ये सर्वात जास्त १३१३ कोटी ५७ लाख जाहिरातींवर खर्च झाला. तर २०१८-१९ मध्ये ११९५ कोटी ३७लाख ५१ हजार इतका करण्यात आला.

गेल्या ५ वर्षांतील जाहिरातींवर दृष्टिक्षेप टाकला असता डिस्प्ले क्लास आणि रेडिओ स्पॉट या जाहिराती मोदी सरकारच्या पसंतीच्या असल्याची बाब समोर येत आहे. यामुळे याप्रकारच्या जाहिरातींवर अनुक्रमे २१०९ कोटी ३० लाख ६२ हजार आणि २१७२ कोटी ७ लाख ४७ हजार खर्च करण्यात आले तर आउटडोर पब्लिसिटीवर ६१२ कोटी १८ लाख ४२हजार रुपये खर्च झाले आहेत.

टॅग्स :नरेंद्र मोदीजाहिरात