मुंबई : सौदी अरेबिया येथे होणाऱ्या हज यात्रेसाठी महाराष्टÑातून जाणाºया भाविकांची पहिली तुकडी शनिवारी रवाना झाली. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी साडे सात वाजता विमानाने उड्डाण घेतले. हज कमिटी आॅफ इंडिया व राज्य हज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला.मक्का मदिना येथे ११ आॅगस्टला हजचा मुख्य विधी होईल. त्यासाठी या वर्षी देशातील २१ विमानतळांवरून २ लाख भाविक सहभागी होतील. ४ जुलैपासून यात्रेकरूंना टप्प्याटप्प्याने पाठविले जाईल. मुंबईतील फ्लाईटने शनिवारी पहिली बॅच रवाना झाली. राज्यातून मुंबई, औरंगाबाद येथून एकूण ५९ विमानांच्या फ्लाईट्स आहेत. त्यामध्ये मुंबई विमानतळावरून ५२ फ्लाईट्स जातील. औरंगाबाद येथून २२ जुलैपासून भाविकांना पाठविण्यात येईल. या वर्षी २,३४० महिला एकट्याने (बिना मेहरम) यात्रा करतील.शनिवारी विमानतळावर निरोप देण्यासाठी यात्रेकरूंचे नातेवाईक उपस्थित होती. सामूहिक दुवा पठण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी हज समितीचे अध्यक्ष जिना शेख, मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ. एम. ए. खान आदी उपस्थित होते.
हज यात्रेसाठी मुंबईतून भाविकांची पहिली तुकडी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 6:04 AM