२०२० वर्षातले पहिले ‘अम्फान’ चक्रीवादळ येणार, स्कायमेटचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 01:17 AM2020-05-17T01:17:26+5:302020-05-17T06:49:49+5:30

बंगालच्या खाडीत उठणारे अम्फान हे चक्रीवादळ कोणत्या दिशेने पुढे सरकेल, हे स्पष्ट झाले नसले तरी सध्या त्याच्या दोन दिशा दाखविल्या जात आहेत.

The first hurricane of the year 'Amphan' will come, Skymet predicts | २०२० वर्षातले पहिले ‘अम्फान’ चक्रीवादळ येणार, स्कायमेटचा अंदाज

२०२० वर्षातले पहिले ‘अम्फान’ चक्रीवादळ येणार, स्कायमेटचा अंदाज

googlenewsNext

मुंबई : २०२० वर्षातले पहिले चक्रीवादळ अम्फान येत्या २४ ते ३६ तासांत उठण्याची शक्यता असून, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर या राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे या चक्रीवादळाच्या दोन दिशा दाखविण्यात आल्या असून, महाराष्ट्रापर्यंत या चक्रीवादळाचा परिणाम होईल आणि महाराष्ट्रातही पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या खाडीत उठणारे अम्फान हे चक्रीवादळ कोणत्या दिशेने पुढे सरकेल, हे स्पष्ट झाले नसले तरी सध्या त्याच्या दोन दिशा दाखविल्या जात आहेत. एक पश्चिम बंगाल, बांगलादेश, दुसरी म्यानमारकडील आहे. पुढील २४ ते ३६ तासांत हंगामातील पहिले चक्रीवादळ येण्याची शक्यता असून ते कोणत्याही दिशेला गेले तरी फटका भारताला बसेल. ते म्यानमार, बांगलादेशकडे गेले तर मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, पश्चिम बंगाल येथे मोठा पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, ओरिसाला धडकले तर छत्तीसगढ, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशावर याचा परिणाम होईल. शिवाय महाराष्ट्र,मध्य प्रदेशवरही परिणाम होणार असून, महाराष्ट्रात पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.

मुंबईत आकाश ढगाळलेले
मुंबई, आसपासच्या परिसरातील आकाश १७ आणि १८ मे रोजी अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २७ अंशांच्या आसपास राहील.

Web Title: The first hurricane of the year 'Amphan' will come, Skymet predicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई