Join us

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच पहिला हप्ता, 2,976 कोटींचा निधी वितरीत

By महेश गलांडे | Published: November 09, 2020 8:42 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असं आश्वासन दिलं होत. त्यासाठी, अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असं आश्वासन दिलं होत. त्यासाठी, अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते.

मुंबई : जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरित करण्यात येईल. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वीच पैसे पडणार आहेत. 

मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असं आश्वासन दिलं होत. त्यासाठी, अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. या अहवालाच्या आधारे वर्गवारी करण्यात आली असून आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा देणारी रक्कम बँक खात्यात जमा होईल.

जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी रु.10 हजार प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रतिहेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार, या मदतीचा पहिला हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशेतकरीमुख्यमंत्री