Join us

महाराष्ट्रात देशातील पहिला ज्वेलरी पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 4:29 AM

देशातील पहिल्या ज्वेलरी पार्कची उभारणी लवकरच मुंबईनजीक करण्यात येणार आहे. सन २०२२ पर्यंत जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील निर्यात ६० अब्ज डॉलरइतकी होईल

मुंबई : देशातील पहिल्या ज्वेलरी पार्कची उभारणी लवकरच मुंबईनजीक करण्यात येणार आहे. सन २०२२ पर्यंत जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील निर्यात ६० अब्ज डॉलरइतकी होईल, असा विश्वास जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष पी.पांड्यायांनी आज व्यक्त केला. देशाच्या विकासाचे इंजिन बनण्याची अपार क्षमता महाराष्ट्रात आहे, असे उद्गार केंद्रीय उद्योगव वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी काढले.मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत आयोजित, ‘निर्यात आधारित औद्योगिकीकरण’ या विषयावरील परिसंवादात हो दोघे बोलत होते.सुरेश प्रभू म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था तीन लाख कोटी अमेरिकन डॉलरची करण्यामध्ये निर्यात क्षेत्राची मोठी भूमिकाअसेल आणि निर्यातक्षमउद्योगांना प्रोत्साहन देण्याचे केंद्राचे धोरण आहे.फेडरेशन आॅफ इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशनचे महासंचालक आणि सीईओ अजय सहाय म्हणाले की तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था साधायची असेल तर देशाने निर्यात किमान ४० टक्क्यांनी वाढविणे आवश्यक आहे. मंजुºया आणि करप्रणालीबाबत केंद्र व राज्यांनी अधिक सुटसुटीतपणा आणावा.केपीएमजीचे संचालक व महाव्यवस्थापक गोपाल पिल्ले, युपीएलचे व्यवस्थापकीय संचालक जयदेव श्रॉफ, विदेशी व्यापार संचालनालयाच्या अतिरिक्त महासंचालक सोनिया सेठी यांनी परिसंवादात भाग घेतला.हिरे घडविण्यासाठी आधी जगातील बरेच देश ते बव्हंशी महाराष्ट्रात पाठवायचे पण काही प्रशासकीय अडथळ्यांमुळे नंतर ते गुजरात आणि दक्षिण आशियात जाऊ लागले. मात्र, आता महाराष्ट्र सरकारने हिरे धोरण आणले असून त्याद्वारे अनेक सवलती व सुविधा दिल्या असल्याने पुन्हा महाराष्ट्राचे या क्षेत्रातील महत्त्व वाढेल.