- सीमा महांगडे
मुंबई : गेल्या वर्षी मुंबई महापालिकेच्या जागेत आणि ग्रंथालीच्या पुढाकाराने मराठी भाषेच्या अभिमत विद्यापीठाची घोषणा करण्यात आली. मात्र त्यानंतर वर्षभराने ग्रंथालीच्या पदाधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात येत आहे. या स्थानिक समितीमार्फत हे विद्यापीठ लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा ग्रंथालीमार्फत होऊन तेथील उपक्रम सुरू होणार असल्याची माहिती ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी दिली.
महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी मागणी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनेकदा करण्यात आली. परंतु, साठ वर्षांत त्याला मूर्त स्वरूप आलेले नव्हते. ग्रंथालीने अभिमत विद्यापीठ स्थापन करण्याचा मानस व्यक्त केला होता़
या विद्यापीठाची वांद्रे येथे उभारणी व्हावी म्हणून ग्रंथालीला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र या जागेची खूपच दुरवस्था असल्याने त्यावर खूप काम कारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवाय या कामांसाठी लागणाऱ्या निधीचीही जुळवाजुळव अनेक सेवाभावी संस्था आणि मराठीविषयी प्रेम वाटणाºया लोकांकडून केली जात आहे.
हे राज्यातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ असणार आहे. त्यामुळे त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना असावी, तसेच त्यामधील उपक्रम कोणते व कसे असावेत, याबाबतचे नियोजन महत्त्वाचे होते, ते आता पूर्ण झाल्याची माहिती हिंगलासपूरकर यांनी दिली. मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत पाठपुरावा केल्याची माहिती हिंगलासपूरकर यांनी दिली़ प्रत्यक्ष जागा ताब्यात आल्यानंतर पुढील कामांना वेळ लागला असल्याने याची संकल्पना आणि उपक्रम सुरू होण्यास तब्बल वर्षभराचा कालावधी उलटला असल्याचेही ते म्हणाले.संवर्धन, विकासासाठी योजना२१०० चौरस फुटांच्या तयार होणाºया या जागेत मराठी भाषेतील सर्व ग्रंथ आणि पुस्तकांनी सज्ज असे अद्ययावत ग्रंथालय साकारण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच मराठी भाषेच्या संवर्धन व प्रचारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती ग्रंथालीकडून देण्यात आली. शासनापेक्षा समाजाकडून मराठीच्या संवर्धनाची आणि त्यासाठी काम केले जाण्याची अपेक्षा ग्रंथालीने व्यक्त केली.एसटीच्या प्रत्येक आगारात साजरा होणार मराठी भाषा दिनच्एसटीच्या सर्व ५६८ बसस्थानकांवर ७० लाख प्रवाशांच्या साक्षीने एसटी कर्मचारी बुधवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करणार आहेत. या वेळी मराठी भाषेच्या संवर्धनाचा जागर केला जाईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.च्महामंडळाने सांगितले की, परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून गेली चार वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात एसटीच्या प्रत्येक आगारात सकाळी ११ वा. स्थानिक पातळीवरील ज्येष्ठ पत्रकार व मराठीचे प्राध्यापक यांच्या हस्ते एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या उपस्थितीत कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले जाईल.