आज अकरावीची पहिली गुणवत्ता यादी, ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी करायची प्रवेशनिश्चिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 03:15 AM2020-08-30T03:15:39+5:302020-08-30T03:16:43+5:30

अकरावी प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित झाली असून त्याप्रमाणे पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये केवळ ३५ विद्यार्थी राज्य मंडळाचे आहेत. ५२ विद्यार्थी आयसीएसई मंडळाचे, तर १३ विद्यार्थी सीबीएसई मंडळाचे आहेत.

The first merit list of the eleventh today, the admission to be done by the students till September 3 | आज अकरावीची पहिली गुणवत्ता यादी, ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी करायची प्रवेशनिश्चिती

आज अकरावीची पहिली गुणवत्ता यादी, ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी करायची प्रवेशनिश्चिती

Next

मुंबई - अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार असून तात्पुरती यादी जाहीर झाल्यानंतरही पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक आहे. रविवारी, दुपारी ३ वाजता ही यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्याला आपल्याला प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय लॉगीनमध्ये दिसणार आहे, तसेच त्यासंबंधित मेसेजही येणार आहे. ३१ आॅगस्टपासून ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आपली प्रवेशनिश्चिती करायची आहे. दरम्यान व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश सुरू राहणार आहेत.
अकरावी प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित झाली असून त्याप्रमाणे पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये केवळ ३५ विद्यार्थी राज्य मंडळाचे आहेत. ५२ विद्यार्थी आयसीएसई मंडळाचे, तर १३ विद्यार्थी सीबीएसई मंडळाचे आहेत. पहिल्या ५०मध्येही केवळ २० विद्यार्थी हे राज्य मंडळाचे आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीसाठी लागणारी पहिली गुणवत्ता यादी कशी लागणार याकडे पालक, विद्यार्थी यांचे लक्ष लागून राहिले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीनंतर कट आॅफ संकेतस्थळावर दर्शविले जाणार आहेत. या यादीमध्ये नाव लागल्यानंतर ही विद्यार्थ्यांना पुढच्या फेरीपर्यंत थांबायचे असल्यास किंवा प्रवेश घ्यायचा नसल्यास प्रोसीड फॉर अ‍ॅडमिशन करू नये, अशा सूचना विद्यार्थ्यांना कराव्या लागणार आहेत.

पहिल्या पसंतीक्रमास प्रवेश बंधनकारक
पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पहिला पसंतीक्रम मिळाला असल्यास विद्यार्थ्याला प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच प्रवेश घेऊन एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश रद्द करायचा असल्यास त्या विद्यार्थ्याला महाविद्यालयाच्या परवानगीने रद्द करता येईल, मात्र त्यालाही पुढील फेऱ्यांसाठी प्रवेश बंद होणार असून त्यालाही विशेष फेरीसाठी थांबावे लागणार असल्याचे नमूद केले आहे.

अकरावीची उपलब्ध जागा ३२०४८०
नोंदणी केलेले विद्यार्थी २७१२५१
पडताळणी झालेले अर्ज २४३१९५
पसंतीक्रम भरलेले अर्ज २२७७८३
कोटाअंतर्गत भरल्या जागा १७५६६
रिक्त जागा ३०३२७४

Web Title: The first merit list of the eleventh today, the admission to be done by the students till September 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.