Join us

एफवायची पहिली मेरिट लिस्ट आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:56 AM

एफवाय प्रवेशासाठी मंगळवारी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. यासाठी आतापर्यंतच्या प्रवेशपूर्व नोंदणी आणि प्रवेश अर्जांनुसार यंदाही कॉमर्सकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याचे चित्र आहे.

मुंबई : एफवाय प्रवेशासाठी मंगळवारी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. यासाठी आतापर्यंतच्या प्रवेशपूर्व नोंदणी आणि प्रवेश अर्जांनुसार यंदाही कॉमर्सकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याचे चित्र आहे. कॉमर्सपाठोपाठ सेल्फ फायनान्सला विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे.मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व आॅनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया १ जून, २०१८ पासून सुरू केली होती. या प्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणीसाठी एकूण २ लाख ७५ हजार ३९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ५४ हजार ९४९ अर्ज करण्यात आले आहेत. कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ही २० जून ते २२ जून २०१८ पर्यंत असेल.८ लाख ५४ हजार ९४९ अर्जमुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया १ जून ते १८ जून २०१८ पर्यंत राबविली होती. यामध्ये १८ जून २०१८ सायंकाळी ५ वाजेपर्यंत २ लाख ७५ हजार ३९० विद्यार्थ्यांनी नोंदणी करून विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ५४ हजार ९४९ एवढे अर्ज केले आहेत.>बीव्होक (फायनान्शिअल मार्केट, ग्रीन हाउस मॅनेजमेंट, मीडिया प्रोडक्शन, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, फार्मा एनेलिटकल सायन्सेस, रिअल इस्टेट मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम) - २, ८२६ जागाएकूण अर्जांमध्ये वाणिज्य शाखेतील परंपरागत आणि स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांसाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत.>अभ्यासक्रमाचे नाव अर्जांची संख्याबीए ५५,६६२बीकॉम (अकाउंट अँड फायनान्स) ८०,७८८बीकॉम (बँकिंग अँड इन्श्युरन्स) २७,८००बीकॉम (फायनान्शिअल मार्केट) १६,६३५बीकॉम २,४९,२५४बीएमएम ५६,५९१बीएमएस १,४७,०३३बीएस्सी (एव्हीएशन) १,८४७बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स) २,५८७बीएस्सी (होम सायन्स) १,०७५बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी) ४,४८९बीएस्सी (आयटी) ६८,४४८बीएस्सी (बायोटेक्नॉलॉजी) २१,२८५बीएस्सी (कॉम्प्यूटर सायन्स) ३४,२७९बीएस्सी ७१,३३०