Join us

शिंदेंवर निशाणा... "आधी आमदार, मग प्रकल्प अन् आता मंत्री गुजरातला पाठवले"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 1:28 PM

तुम्हाला माहिती आहे आज मी बिहार दौऱ्यावर आहे, ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत.

मुंबई - राज्यात अचानक सत्तापालट झालं असून आता मुंबई महापालिका निवडणुका कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यातच बुधवारी २३ नोव्हेंबरला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जाणार असल्यानं चर्चेला उधाण आले आहे. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यामागचं नियोजन सांगितलं नसलं तरी १ दिवसीय दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात आता स्वत: आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात, शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. तर, देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुकही केलं. 

तुम्हाला माहिती आहे आज मी बिहार दौऱ्यावर आहे, ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे क्लाईमेंट चेंज आणि पर्यावरण या विषयावर चर्चा करू. मला त्या घाणेरड्या राजकारणात जायचे नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच, बिहार दौऱ्यासंदर्भात बोलताना, तुम्ही खूप विष्लेशण करू नका, थर्ड फ्रंटचा विचार नाही. माझा काही अजेंडा नाही, आम्ही सत्तेत ते विरोधात असताना अनेक वेळा माझे तेजस्वी यादव यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. त्यामुळेच, आज प्रत्यक्ष भेटणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले.  

मी आज एक बातमी ऐकली की, आजची मंत्रीमंडळ बैठक रद्द करण्यात आली. कारण, एक पक्ष दुसऱ्या राज्याच्या प्रचारात व्यस्त आहे. त्यांनी आधी आमदार, मग प्रकल्प आणि आता मंत्री गुजरातला पाठवले. महाराष्ट्रात बेरोजगार, ओला दुष्काळ असे असंख्य प्रश्न असताना मंत्रिमंडळ तिकडे प्रचारात व्यस्त आहे. महाराष्ट्रासाठी एक तास दिला असता तर काही वाईट झाले नसते, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

राज्यपालांवर काय कारवाई करणार?

ज्यांनी पीडीपीबरोबर युती केली त्यांनी आमच्यावर टीका करू नये. ज्यांच्या विरोधात भाषण केली, त्यांच्याबरोबर जाऊन बसले त्यांनी आम्हाला शिकवू नये. राज्यपाल महाराष्ट्राचे असून त्यावर टिका करतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?  तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही तुमची भुमिका स्पष्ट करा आणि राज्यपालांवर काय कारवाई करणार ते सांगा, असा सवालही आदित्य यांनी राज्यपालांच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी विचारला.  

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबईएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस