पहिला खासदार निधी कुष्ठरुग्णांसाठी

By admin | Published: June 19, 2014 01:06 AM2014-06-19T01:06:33+5:302014-06-19T01:06:33+5:30

प्रथमच खासदार म्हणून निवडून आलो असून पहिला खासदार निधी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी देण्याची ग्वाही कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

First MP fund for leprosy | पहिला खासदार निधी कुष्ठरुग्णांसाठी

पहिला खासदार निधी कुष्ठरुग्णांसाठी

Next

कल्याण : प्रथमच खासदार म्हणून निवडून आलो असून पहिला खासदार निधी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी देण्याची ग्वाही कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
कल्याण पत्रीपूलनजीकच्या कचोरेमधील हनुमाननगर कुष्ठरुग्ण वसाहत येथे विद्यार्थी उत्कर्ष संस्थेच्या वतीने शिंदे यांचा सत्कार आणि कुष्ठरुग्णांच्या मुलांना वह्या वाटप या कार्यक्रमाचे रविवारी आयोजन केले होते. या वेळी सभागृह नेता कैलास शिंदे, गटनेते रवींद्र पाटील, हनुमाननगर कुष्ठरुग्ण संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, उत्कर्ष संस्थेचे भूपाल फिरगाणे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी समाजमंदिर आणि व्यायामशाळा उभारणीसाठी खासदार निधी मिळावा, अशी विनंती कुष्ठरुग्णांच्या वतीने करण्यात आली. ही विनंती मान्य करीत उल्हासनगर श्रीराम मंदिर कुष्ठरुग्ण वसाहतीलाही खासदार निधी दिला जाईल, अशी ग्वाही शिंदेंनी दिली. कुष्ठरुग्णांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्राकडूनदेखील निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कुष्ठरुग्णांच्या मानधनात ५०० रुपयांची नुकतीच वाढ करण्यात आली असून वेळोवेळी या मानधनात वाढ केली जाणार असल्याचे आश्वासन सभागृह नेते शिंदेंनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: First MP fund for leprosy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.