मलनिस्सारण प्रक्रिया करणारी पहिली महापालिका
By Admin | Published: October 1, 2014 01:25 AM2014-10-01T01:25:55+5:302014-10-01T01:25:55+5:30
शुद्ध होणारे पाणी बगिचे, घरगुती कामे, बांधकामे आणि औद्योगिक वापरासाठी उपयोगात येणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी नवी मुंबई महापालिका राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे.
>नवी मुंबई : झपाटय़ाने वाढणा:या लोकसंख्येला पिण्याव्यतिरिक्त इतर उपयोगासाठी मुबलक पाणी मिळावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेने सी-टेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. शहरात अशा प्रकारची सहा मलप्रक्रिया केंद्रे सुरू झाली असून, यातून शुद्ध होणारे पाणी बगिचे, घरगुती कामे, बांधकामे आणि औद्योगिक वापरासाठी उपयोगात येणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी नवी मुंबई महापालिका राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे.
मूळ ऑस्ट्रियाचे असलेल्या सी-टेक तंत्रज्ञावर आधारित शहरात एकूण 424 द.ल.लि. क्षमतेची सहा मलप्रक्रिया केंद्रे सध्या कार्यरत आहेत. शहरात निर्माण होणा:या सांडपाण्यावर या केंद्रांमध्ये प्रक्रिया करून ते पिण्याच्या पाण्याइतके शुध्द केले जाते. या पाण्याचा बीओडी हा पाचपेक्षा कमी असतो. सीवूड येथील प्रकल्पावर सध्या प्रायोगिक तत्त्वावर 1 द.ल.लि इतके प्रक्रियाकृत पाणी बिगर घरगुती वापरासाठी देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. कोपरखैरणो येथील शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात आलेल्या क्षेपणभूमीवर विकसित करण्यात आलेले निसर्ग उद्यान फुलविण्यासाठी या प्रक्रियाकृत पाण्याचा वापर केला जात आहे. मुख्य रस्ते साफसफाई करणा:या यांत्रिक वाहनांमध्ये देखील हेच प्रक्रियाकृत पाणी वापरण्यात येते आहे.
लोकसंख्या वाढीमुळे भविष्यात मलनिस्सारण व्यवस्था कोलमडू नये, यासाठी ही संपूर्ण व्यवस्था बदलण्याची भूमिका राष्ट्रवादीचे नेते गणोश नाईक यांनी घेतली होती. त्यानुसार आमदार संदीप नाईक यांनी महापौर सागर नाईक व महापालिका प्रशासनाबरोबर चर्चा करून मलनिस्सारण व्यवस्थापनासाठी सी-टेक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची सूचना केली होती. त्यासाठी सर्वप्रथम शहरातील जुन्या मलनिस्सारण वाहिन्या बदलणो गरजेचे होते. माजी खासदार संजीव नाईक यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मोठय़ा मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला. तर महापालिकेच्या माध्यमातून अंतर्गत मलवाहिन्या बदलण्यात आल्या. एकूण पुढील 50 वर्षाचे व्हिजन लक्षात घेऊन या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई शहरालगत निर्माण होणा:या साधारणत: 100 टक्के सांडपाण्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून ते शुद्ध करणारी नवी मुंबई ही राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे. मलनिस्सारण व्यवस्थापन प्रक्रियेत अत्याधुनिक कार्यप्रणाली राबवून केलेल्या पर्यावरणपूरक कामगिरीबद्दल ईपीसी वल्र्ड मीडिया अॅवॉर्डने नवी मुंबई शहराचा गौरव करण्यात आला आहे.
दिल्ली, बंगलोर, चेन्नई या देशातील प्रगतीशील महानगरांमध्ये देखील सांडपाण्यावर 1क्क् टक्के प्रक्रिया केली जात नाही. नवी मुंबई शहरात मात्र अशा प्रकारची प्रक्रिया केली जाते. यामुळे सांडपाणी खाडीत सोडल्याने होणारे जलप्रदूषण टळणार आहे. दुसरीकडे नवी मुंबई शहरालगत असलेल्या ठाणो आणि मुंबई महापालिकांकडे अशा प्रकारची मलनिस्सारणाची व्यवस्थाच नसल्याने प्रदूषित पाणी या महापालिकांकडून खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित बनली आहे. नवी मुंबईत सांडपाण्यावर 1क्क् टक्के प्रक्रिया होत असल्याने खाडीत प्रदूषण होत नाही़ यामुळे जलप्रदूषणाला आळा बसेल.