Join us

Oxygen: दिलासादायक! पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस मुंबईत आली; ८६० किमी प्रवास करून ३ टँकर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 3:14 PM

गुजरातमधील हापा येथून ३ ऑक्सिजन टँकरसह रो-रो सेवा आज महाराष्ट्रातील कळंबोली येथे पोहोचली, कोविड -१९ विरुद्धच्या लढ्यात रेल्वे ऑक्सिजन एक्सप्रेस चालवित आहे

ठळक मुद्देऑक्सिजन एक्सप्रेसच्या वेगवान हालचालीसाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला आहे.  लिक्विड ऑक्सिजन हा एक क्रायोजेनिक कार्गो असल्याने जास्तीत जास्त वेगाची, जास्तीत जास्त प्रवेगाची आणि घसरणीबद्दल अत्यंत काळजी घेतली जात आहेगेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली

मुंबई - लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) ने भरलेली तीन टँकर घेऊन जाणारी एक रो-रो सेवा २५ एप्रिल, २०२१ रोजी गुजरातमधील हापा येथून १८.०३ वाजता सुटली आणि २६ एप्रिल, २०२१ रोजी सकाळी ११.२५ वाजता महाराष्ट्रातील कळंबोली येथे पोहोचली. मेसर्स रिलायन्स इंडस्ट्रीज, जामनगर यांचे द्वारा या  टँकर्सचा पुरवठा करण्यात आला. ऑक्सिजन एक्सप्रेसने आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी ८६० किलोमीटरचा प्रवास केला आहे. 

या टँकर्सने अंदाजे ४४ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वाहून आणला. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या सुरळीत हालचालीसाठी कळंबोली गुड्स शेड येथे आवश्यक त्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन एक्सप्रेस हापा येथून विरमगाव, अहमदाबाद, वडोदरा, सूरत, वसई रोड आणि भिवंडी रोड मार्गे सुरक्षेच्या सर्व बाबी पाळून कळंबोलीला पोहोचली आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वेगवान हालचालीसाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून देशभरातील कोविड -१९ रूग्णांना वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात यावे आणि त्यामुळे गरजूंना उपयोग व्हावा यासाठी रेल्वे सर्वप्रथम प्रयत्न करीत आहे.

रेल्वेने आतापर्यंत मुंबई ते विझाग आणि विझाग ते नागपूर व नाशिक आणि लखनऊ - बोकारो - लखनऊ दरम्यान ऑक्सिजन एक्सप्रेस चालविली असून २५.४.२०२१ पर्यंत सुमारे १५० टन द्रव ऑक्सिजन वाहून नेले आहे.  आणखीन ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्यात येत आहेत आणि देशाच्या विविध भागांतून त्याचे नियोजन केले जात आहे. लिक्विड ऑक्सिजन हा एक क्रायोजेनिक कार्गो असल्याने जास्तीत जास्त वेगाची, जास्तीत जास्त प्रवेगाची आणि घसरणीबद्दल अत्यंत काळजी घेतली जात आहे. गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली आणि आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली.

टॅग्स :ऑक्सिजनगुजरातमुंबईकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस