Join us

सांगली जिल्हा परिषदेला प्रथम पंचायतराज पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 3:42 AM

यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सांगली जिल्हा परिषदेला २५ लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुंबई : यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सांगली जिल्हा परिषदेला २५ लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्ग आणि अमरावती जिल्हा परिषदेला अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पुरस्कार मिळाला आहे.पंचायत समित्यांमध्ये भंडारा पं.स. ला प्रथम (१७ लाख रु), कुडाळ जि. सिंधुदुर्ग द्वितीय (१५ लाख) तर तृतीय पुरस्कार (१३ लाख) सांगली जिल्ह्यातील शिराळा पंचायत समितीला मिळाला. गुणवंत अधिकारी म्हणून अनिल देवकाते, आनंद भंडारी, परिक्षित यादव, विजय चव्हाण यांचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे शुक्रवारी झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, उपसचिव संजय बनकर यांच्यासह विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींसह जिल्हा पातळीवरील अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.