मुंबई : २८ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘डोण्ट वरी बी हॅपी’ या नाटकाला रु. ५ लाखांचे प्रथम पारितोषिक मिळाले. या स्पर्धेचा निकाल सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केला आहे.
अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे -दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक चंद्रकांत कुलकर्णी (वाडा चिरेबंदी), द्वितीय - अद्वैत दादरकर (डोण्ट वरी बी हॅपी, तृतीय - राजेश देशपांडे (श्री बाई समर्थ)नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक - मिहीर राजदा (डोण्ट वरी बी हॅपी), द्वितीय - हिमांशू स्मार्त (परफेक्ट मिसमॅच), तृतीय - राजेश देशपांडे (श्री बाई समर्थ), प्रकाशयोजना : प्रथम पारितोषिक - रवी रसिक (वाडा चिरेबंदी), द्वितीय - शीतल तळपदे (परफेक्ट मिसमॅच), तृतीय - अमोघ फडके (डोण्ट वरी बी हॅपी)नेपथ्य : प्रथम पारितोषिक - प्रदीप मुळ्ये (वाडा चिरेबंदी), द्वितीय - प्रदीप मुळ्ये (डोण्ट वरी बी हॅपी), तृतीय - प्रदीप मुळ्ये (परफेक्ट मिसमॅच)संगीत दिग्दर्शन - प्रथम पारितोषिक - आनंद मोडक (वाडा चिरेबंदी), द्वितीय - साई-पीयूष (डोण्ट वरी बी हॅपी), तृतीय - राहुल रानडे (परफेक्ट मिसमॅच)वेशभूषा : प्रथम पारितोषिक - प्रतिमा जोशी (वाडा चिरेबंदी), द्वितीय - चैत्राली डोंगरे (डोण्ट वरी बी हॅपी), तृतीय - असिता नार्वेकर (श्री बाई समर्थ)रंगभूषा : प्रथम पारितोषिक - कृष्णा खेडकर (श्री बाई समर्थ), द्वितीय - किशोर पिंगळे (वाडा चिरेबंदी), तृतीय - महेंद्र झगडे (डोण्ट वरी बी हॅपी)उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पुरुष कलाकार : किरण माने (परफेक्ट मिसमॅच), उमेश कामत (डोण्ट वरी बी हॅपी), वैभव मांगले (वाडा चिरेबंदी), अरुण नलावडे (श्री बाई समर्थ), समीर चौघुले (श्री बाई समर्थ)स्त्री कलाकार : अमृता सुभाष (परफेक्ट मिसमॅच), स्पृहा जोशी (डोण्ट वरी बी हॅपी), निवेदिता सराफ (वाडा चिरेबंदी), नेहा जोशी (वाडा चिरेबंदी), निर्मिती सावंत (श्री बाई समर्थ)परीक्षक म्हणून डॉ. विश्वास मेहेंदळे, बाबा पार्सेकर, अरविंद औंधे, डॉ. मंगेश बनसोड आणि श्रीमती स्वरूप खोपकर यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)