पहिल्याच पावसाने मुंबईची लावली वाट, महापालिकेच्या कामांचे पुरते 'ऑडिट'; रस्त्यावरून वाहिले पाण्याचे पाट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 06:27 AM2023-06-26T06:27:07+5:302023-06-26T06:27:27+5:30
Mumbai Rain: मुंबई विलंबाने आलेल्या पर्जन्यराजाने पहिल्याच दिवशी मुंबई शहर, उपनगरात जोरदार बरसून मुंबईकरांची दैना केली. पर्जन्य राजाने उडवलेल्या दाणादाणीमुळे अनेक ठिकाणी मुंबई महापालिकेच्या कामांचे पुरते 'ऑडिट' केले आहे.
मुंबई विलंबाने आलेल्या पर्जन्यराजाने पहिल्याच दिवशी मुंबई शहर, उपनगरात जोरदार बरसून मुंबईकरांची दैना केली. पर्जन्य राजाने उडवलेल्या दाणादाणीमुळे अनेक ठिकाणी मुंबई महापालिकेच्या कामांचे पुरते 'ऑडिट' केले आहे. पाऊस वेगाने वाहणारा वारा, पावसाचे टपोरे थेंब आणि रस्त्यावरून वाहणारे पावसाच्या पाण्याचे पाट यामुळे मुंबईची यंत्रणा धीमी झाली होती.
मान्सूनने रविवारी सकाळी मुंबईत प्रवेश केला असला तरी शनिवारी सायंकाळपासून रविवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पावसाने तुफान फटकेबाजी केली होती. वरळी येथील सीलिंक गेटजवळ गफार खान रोडवर वाहनांची गती कमी झाली होती. असल्फा, साकीनाका जंक्शनवर वाहनांची गती मंदावली होती. पाणी साचल्याने बी. डी. रोड, महालक्ष्मी मंदिर येथे वाहतूक धीमी झाली होती. पाणी साचल्याने अंधेरी येथील सब वे बंद करण्यात आला होता; येथील वाहतूक एस. व्ही. रोडवर वळविण्यात आली होती. शनिवारी अंधेरी सब वे येथे पाणी साचल्याने वाहनचालकांचे हाल झाले.
मुंबई शहरातील जेजे फ्लायओव्हरवरून पाण्याचे लोंढे वाहत होते. मस्जिद बंदर, लालबाग, सायन सर्कल येथील वाहतुकीचा वेग कमी झाला होता. मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावर नेहमीप्रमाणे शीतल सिग्नल येथे वाहनचालकांसह नागरिकांना अडचणी आल्याने त्यांनी होती.
महापालिकेच्या नावाने बोटे मोडली. कमानी जंक्शनवरून खाली शीतल सिनेमाकडे येणाऱ्या पाण्याने हा रस्ता पूर्णपणे जलमय झाला होता. कुर्ल्याहून अंधेरीकडे जाणारी वाहतूक साकीनाका, जरीमरी येथे मंदावली होती.
मुंबईत रविवारी रिमझिम पाऊस
मुंबईत रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरु होता. सांताक्रुझ येथे १७ तर कुलाबा येथे ३३ मिमी पावसाची नोंद झाली.मुंबई शहरातील जे. जे. फ्लायवरून पाण्याचे लोंढे वाहत होते. मस्जिद
रात्रभर बरसात
शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत मुंबईत अधून मधून का होईना पावसाची बरसात होती. विशेषतः वेगवान वायासोबत पावसाच्या जोरदार सरी मुंबईकरांना काही काळ धडकी भरवत होत्या.
१७६ मिलीमीटर पाऊस
शनिवारी सायंकाळपासून रविवारी पहाटेपर्यंत मुंबईत पावसाने खणखणीत हजेरी लावली. शनिवारी सायंकाळी ५ ते रात्री ७ वाजेपर्यंत मुंबईत ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी पहाटे ८.३० वाजता मुंबईत एकूण १७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.