अकरावीच्या पहिल्या फेरीमध्ये ४५ टक्के विद्यार्थ्या$ंनी केली प्रवेशनिश्चिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 07:39 AM2020-09-05T07:39:31+5:302020-09-05T07:40:04+5:30

मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या ४० हजार ४७६ विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार ६८५ विद्यार्थ्या$ंनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.

In the first round of the 11th, 45% of the students confirmed their admission | अकरावीच्या पहिल्या फेरीमध्ये ४५ टक्के विद्यार्थ्या$ंनी केली प्रवेशनिश्चिती

अकरावीच्या पहिल्या फेरीमध्ये ४५ टक्के विद्यार्थ्या$ंनी केली प्रवेशनिश्चिती

Next

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या नियमित फेरीमध्ये १ लाख १७ हजार ५२० विद्यार्थ्या$ंची निवड झाली होती. त्यापैकी ५३ हजार ३८३ म्हणजे केवळ ४५% विद्यार्थ्यांनीच आपल्या प्रवेशाची निश्चिती केली आहे.
मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या ४० हजार ४७६ विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार ६८५ विद्यार्थ्या$ंनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. आतापर्यंत अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये कोट्यांतर्गत आणि आॅनलाइन मिळून एकूण ७८ हजार ६१० विद्यार्थ्या$ंनी प्रवेश घेतले आहेत.
आजपासून अकरावी आॅनलाइनच्या नियमित फेरी-२ साठी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरण्याची संधी विद्यार्थ्या$ंना उपलब्ध होणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आॅनलाइन नोंदणी केलेली नाही, असे विद्यार्थी भाग १ आणि भाग २ भरू शकतील. यासाठी ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
याशिवाय या कालावधीत कॉलेजांना व्यवस्थापन तसेच अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशासाठी अर्ज मागविता येतील. यानंतर १० सप्टेंबर रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

Web Title: In the first round of the 11th, 45% of the students confirmed their admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.