आयटीआयच्या पहिल्या फेरीत ३५ टक्के विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:10 AM2021-09-17T04:10:08+5:302021-09-17T04:10:08+5:30

३१,८५७ जागांवर प्रवेश निश्चिती : दुसऱ्या फेरीसाठी ६१ हजार जागांची अलॉटमेंट लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आयटीआयच्या पहिल्या फेरीतील ...

In the first round of ITI, 35% students took admission | आयटीआयच्या पहिल्या फेरीत ३५ टक्के विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

आयटीआयच्या पहिल्या फेरीत ३५ टक्के विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

Next

३१,८५७ जागांवर प्रवेश निश्चिती : दुसऱ्या फेरीसाठी ६१ हजार जागांची अलॉटमेंट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयटीआयच्या पहिल्या फेरीतील प्रवेशांना यंदा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून केवळ ३५ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. राज्यात आयटीआयच्या पहिल्या फेरीसाठी ९०,५४१ विद्यार्थ्यांना जागा अलॉट करण्यात आल्या होत्या; मात्र त्यातील केवळ ३१,८५७ जागांवर प्रवेशाची निश्चिती विद्यार्थ्यांकडून झाली आहे. त्यातील २४ हजार प्रवेश हे शासकीय आयटीआय तर केवळ ७,०७४ प्रवेश खासगी आयटीआयमध्ये झाले आहेत. दरम्यान, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ६१,९९० जागांवर प्रवेश अलॉट करण्यात आले आहेत. प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांना २० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

यंदा इतर अभ्यासक्रमांप्रमाणे आयटीआयसाठीही राज्यात नोंदणी कमी झाली आहे. आयटीआयच्या मागील वर्षीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाप्रमाणे यंदाही पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चितीला कमी प्रतिसाद मिळाला. मागील वर्षी पहिल्या फेरीच्या अंती राज्यात ३२,२६० प्रवेश झाले होते. यंदा अलॉट झालेल्या जागांमध्ये ८१ टक्के जागा या शासकीय तर ३७ टक्के जागा या खासगी आयटीआयमधील होत्या. शासकीय आयटीआयमध्ये ७५,०६१ जागा अलॉट करण्यात आल्या होत्या त्यापैकी २४,७८३ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर खासगी आयटीआयच्या १५,४८० जागा अलॉट करण्यात आल्या होत्या त्यापैकी ७,०७४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

आयटीआयच्या दुसऱ्या फेरीसाठी कॅप जागांचे अलॉटमेंट जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय आयटीआयमधील ५३,७५६ जागांचा तर खासगी आयटीआयमधील ८,२३४ जागांचा समावेश आहे. आयटीआयच्या पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चितीच्या कमी प्रतिसादानंतर आता दुसऱ्या फेरीतील प्रवेशांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चौकट

आयटीआय प्रवेशाची पहिली फेरी

आयटीआय - शासकीय - खासगी - एकूण

एकूण संख्या - ४१७- ५५९- ९७६

कॅप जागा - ९२३११- ४०८०३- १३३११४

व्यवस्थापन जागा - ० - १३१४५- १३ १४५

एकूण क्षमता - ९२३११- ५३९४८- १४६२५९

अलॉटमेंट - ७५०६१- १५४८०- ९०५४१

पहिल्या फेरीतील प्रवेश - २४८४६- ७०८५- ३१९३१

दुसऱ्या फेरीतील अलॉटमेंट - ५३७५५- ८२३५- ६१९९०

कॅप जागांचे अलॉटमेंट - ८०%- २४%- ६१%

Web Title: In the first round of ITI, 35% students took admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.