Admission: प्रवेशाची पहिली फेरी साठ हजारी, अकरावी ॲडमिशन प्रक्रिया; आता प्रतीक्षा दुसऱ्या गुणवत्ता यादीची

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 10:25 AM2023-06-25T10:25:45+5:302023-06-25T10:26:09+5:30

Admission: अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवता यादीनुसार, शनिवार सायंकाळपर्यंत ३० हजार २२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पहिल्या यादीत एक लाख ३६ हजार २२९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता.

First round of admission sixty thousand, eleventh admission process; Now waiting for the second merit list | Admission: प्रवेशाची पहिली फेरी साठ हजारी, अकरावी ॲडमिशन प्रक्रिया; आता प्रतीक्षा दुसऱ्या गुणवत्ता यादीची

Admission: प्रवेशाची पहिली फेरी साठ हजारी, अकरावी ॲडमिशन प्रक्रिया; आता प्रतीक्षा दुसऱ्या गुणवत्ता यादीची

googlenewsNext

 मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवता यादीनुसार, शनिवार सायंकाळपर्यंत ३० हजार २२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पहिल्या यादीत एक लाख ३६ हजार २२९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. यापैकी केवळ ६० हजार २२३ विद्याथ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे.

अद्याप १ लाख ७६ हजार २७१ जागा रिक्त असून एक लाख ८५ हजार 639 विद्याथ्र्यांनी प्रवेश घेणे बाकी आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीसाठी २ लाख २५ हजार ७५३ विद्यार्थी पात्र ठरले होते. प्रवेश घेण्याची मुदत निवारी सायंकाळी संपली आहे. 

पहिल्या पसंतीचे कॉलेज ५७ हजार ३२७ विद्याथ्र्यांना मिळाले आहे. त्यातील केवळ ४३ हजार ४२०  विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिली पसंती मिळूनही २२४ विद्याथ्र्यांनी  प्रवेश नाकारला आहे, तर १०८ जणांनी प्रवेश रद्द केला आहे. 

दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या 29 हजार ९३४ विद्याथ्र्यांपैकी हजार १३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या हजार ६३ विद्यार्थ्यांपैकी ३  हजार ५९८  विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.  

Web Title: First round of admission sixty thousand, eleventh admission process; Now waiting for the second merit list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.