Join us

डेक्कन क्वीनमधील व्हिस्टाडोम कोचची पहिली फेरी हाउसफुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 8:46 AM

Deccan Queen : सध्या व्हिस्टाडोम कोच मुंबई-मडगाव जन शताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे. मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जूनपासून व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता, त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन एक्स्प्रेसनंतर आता डेक्कन क्वीनमध्येही १५ ऑगस्टपासून व्हिस्टाडोम कोच जोडला आहे. विशेष डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधील व्हिस्टाडोम कोचच्या पहिल्या फेरीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. इतकेच नव्हे तर हा व्हिस्टाडोम कोच १६ ऑगस्ट रोजीही पूर्णतः आरक्षित (हाउसफुल्ल) झालेला आहे.सध्या व्हिस्टाडोम कोच मुंबई-मडगाव जन शताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे. मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जूनपासून व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता, त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे याच मार्गावर डेक्कन क्वीनमध्येही हा कोच जोडण्यात आला आहे.व्हिस्टाडोम कोचमुळे मुंबई-पुणे मार्गावरील प्रवासी येथून जाताना जवळच्या माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसदरी जवळील), उल्हास नदी (जांबरूंग जवळील), उल्हास व्हॅली, खंडाळा परिसर इत्यादीचा आणि लोणावळा आणि दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे आणि धबधबे या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात. विस्टाडोम कोचच्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाइड विंडो पॅन आणि काचेचे छप्पर (टॉप), फिरण्यायोग्य खुर्ची आणि पुशबॅक खुर्च्या इत्यादीचा समावेश आहे.व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. डेक्कन एक्स्प्रेस मध्ये लावण्यात आलेल्या पहिल्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता, रविवारी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधून डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्येही एक व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला. 

टॅग्स :मुंबई