मुंबई : प्राधान्य फेरीच्या पहिल्या फेरीनंतर आता दुसऱ्या फेरीचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडेल. ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ यानुसार दुस-या फेरीत एटीकेटी आणि पुनर्परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेश फेरीचा निर्णय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने घेतला. यासाठी महाविद्यालयांना रिक्त जागा जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा महाविद्यालयांकडून रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या असून ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ फेरी-२साठी ६७,२९६ जागा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. कोट्यासह या जागांची संख्या ८४,१०६ आहे.प्राधान्य फेरी १ प्रमाणेच या फेरीतही प्रवेशासाठी तीन गट करण्यात आले असून प्रवेशाचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. गट क्रमांक १मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण आहेत असे विद्यार्थी या फेरीसाठी पात्र आहेत. तसेच कोट्याच्या जागांमध्ये इनहाउस ५,००७, अल्पसंख्याक ७,७९२ तर व्यवस्थापनाच्या ४,०११ जागा आहेत.महाविद्यालयाची निवड केल्यानंतर त्यासमोरील (अप्लाय नाऊ) या नावाची कळ दाबून विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करायचा आहे. याच प्रकारे उर्वरित दोन गटांची प्रवेश प्रक्रिया होईल.
अकरावी प्रवेशाच्या प्राधान्य फेरी दोनचा पहिला टप्पा आज; कोट्यासह एकूण ८४,१०६ जागा उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 3:01 AM