'चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या'; राणेंच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणतात...

By मुकेश चव्हाण | Published: December 21, 2020 04:51 PM2020-12-21T16:51:50+5:302020-12-21T17:02:05+5:30

केंद्राने राज्याला नाव देण्याचा अधिकार असल्याचं सांगितलंय.

First start the airport, then name it, said Chief Minister Uddhav Thackeray | 'चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या'; राणेंच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणतात...

'चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या'; राणेंच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणतात...

googlenewsNext

मुंबई/ सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे काम आता पूर्ण होत आले आहे. मात्र याचपार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. चिपी विमानतळाच्या नामकरणासाठी दोन दिग्गज नावांचा प्रस्ताव समोर आलाय. यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपाचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. 

नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ नारायण राणे Dream Project आहे. म्हणून या विमानतळाला "स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ" हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. 

तसेच नारायण राणे यांनी देखील चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं, असं मत व्यक्त केलं आहे. मात्र प्रथम विमानतळ सुरू करा, मग नाव द्या, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 

दरम्यान, केंद्राने राज्याला नाव देण्याचा अधिकार असल्याचं सांगितलंय. विमानतळ लवकर चालू करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. 26 जानेवारी 2021 ला हे विमानतळ सुरू करण्याबाबत संबंधितांना सांगितलं आहे. याबाबत परवाना (लायसन्स) मिळालं की लवकरच विमानतळ सुरू करू. हे विमानतळ अत्याधुनिक पद्धतीने बनवलं असल्याने त्याचा मोठा उपयोग होणार आहे, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. 

Web Title: First start the airport, then name it, said Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.