मुंबई : फेरीवाला संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करू नये, या मागणीसाठी मुंबईकाँग्रेसच्या वतीने बोरीवली येथे मोर्चा काढण्यात आला. फेरीवाला कायदा लागू न करता केलेली पालिकेची कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.देशात २०१४ मध्ये फेरीवाला संरक्षण कायदा लागू करण्यात आला. या कायद्यानुसार जर कोणी २०१४ च्या पूर्वीपासून एखाद्या जागेवर फेरीचा धंदा करत असेल, तर त्याला त्याच्या जागेवरून हटविता येत नाही. तशी कारवाई करायचीच असेल तर महापालिकेने त्याला पर्यायी जागा द्यायला हवी. या फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी न करताच पालिका अधिकाºयांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्याला काँग्रेसचा तीव्र विरोध असून काँग्रेस पूर्णपणे फेरीवाल्यांच्या पाठीशी असल्याचे निरुपम यांनी सांगितले.महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केलेले नाही. सर्वेक्षणासाठी नेमलेल्या टाऊन व्हेंडिंग कमिटीची कोणतीही बैठक आजवर झाली नाही. त्यामुळेच या कायद्याची अंमलबजावणी करता आली नाही. त्यामुळे जोपर्यंत फेरीवाला संरक्षण कायदा लागू केला जात नाही तोपर्यंत फेरीवाल्यांना त्यांच्या जागेवरून हटविण्याचा मुंबई महापालिकेला काहीही अधिकार नाही. महापालिका अधिकाºयांनी गरीब फेरीवाल्यांविरोधात द्वेषाचे राजकारण करू नये आणि विनाकारण त्यांना त्रास देऊ नये, असा इशाराही निरुपम यांनी दिला.संविधान गौरव यात्रामुंबई काँग्रेसच्या वतीने आज संविधान गौरव यात्रेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. संविधान रथाच्या माध्यमातून स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांत काँग्रेस सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविणार आहोत. तसेच साडेचार वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखाही या माध्यमातून मांडण्यात येणार असल्याचे निरुपम यांनी सांगितले. मुंबईच्या विविध भागांत स्थानिक कार्यकर्ते संविधान गौरव यात्रेद्वारे काँग्रेसचे काम लोकांपर्यंत पोहोचवतील, असेही निरुपम म्हणाले.
आधी फेरीवाला कायदा आणा, मगच कारवाई करा - काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 1:01 AM