मुंबई : एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेनंतर मुंबईत फेरीवाल्यांवरील कारवाईने वेग घेतला आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणीची मागणीही जोर धरत असताना, पालिका आयुक्त अजय मेहता यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्तपदी निधी चौधरी यांची नियुक्ती केलीे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाºयाची या पदावर नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.फेरीवाला धोरण लागू करण्यासाठी पालिकेने समिती स्थापन केली. समितीच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविला आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला राज्य सरकारची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. या प्रक्रियेला वेग मिळावा, यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्तपदी निधी चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर या विभागाचे आताचे उपायुक्त रणजीत ढाकणे यांची परिमंडळ सहाच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आनंद वाघराळकर यांची परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदावरून परिमंडळ तीनच्या उपायुक्तपदी, तर नरेंद्र बर्डे यांची परिमंडळ सहाच्या उपायुक्त पदावरून परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अतिक्रमण निर्मूलन विभागात पहिल्यांदाच सनदी अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 1:07 AM