देशात प्रथमच ‘सायलेंट डिलिव्हरी स्टेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:56 AM2018-01-19T03:56:33+5:302018-01-19T03:56:40+5:30

सध्या आॅनलाइन जगतात अग्रेसर असलेल्या अ‍ॅमेझॉन डॉट इनने ‘सायलेंट डिलिव्हरी स्टेशन’ या अनोख्या उपक्रमास मुंबईत सुरुवात केली आहे. देशात प्रथमच या प्रयोगांतर्गत अ‍ॅमेझॉनने मिरॅकल कुरिअर्सच्या मदतीने डिलिव्हरी स्टेशन सुरू केले आहे.

 For the first time in the country 'Silent Delivery Station' | देशात प्रथमच ‘सायलेंट डिलिव्हरी स्टेशन’

देशात प्रथमच ‘सायलेंट डिलिव्हरी स्टेशन’

Next

मुंबई : सध्या आॅनलाइन जगतात अग्रेसर असलेल्या अ‍ॅमेझॉन डॉट इनने ‘सायलेंट डिलिव्हरी स्टेशन’ या अनोख्या उपक्रमास मुंबईत सुरुवात केली आहे. देशात प्रथमच या प्रयोगांतर्गत अ‍ॅमेझॉनने मिरॅकल कुरिअर्सच्या मदतीने डिलिव्हरी स्टेशन सुरू केले आहे. विशेष म्हणजे या स्टेशनमध्ये केवळ कर्णबधिर व्यक्तींना रोजगार देण्यात आला आहे.
समाजातील कोणत्याही घटकातील व्यक्ती असल्यास त्यांना त्यांच्या खºया क्षमतांची ओळख पटावी, त्यांना संधी मिळावी, हे ध्येय समोर ठेवून हा उपक्रम उभारण्यात आला. अभिनव संकल्पना, तंत्रज्ञानाने सज्ज संसाधने, या स्टेशनसाठी उपलब्ध करून दिल्याचे अ‍ॅमेझॉन इंडियाच्या इंडिया कस्टमर फुलफिलमेंट विभागाचे उपाध्यक्ष अखिल सक्सेना यांनी सांगितले.
सुरुवातीला चार कर्णबधिर साहाय्यकांची नेमणूक केली. हे साहाय्यक श्रवणक्षमता असलेल्या सहकाºयांसह अ‍ॅमेझॉन डिलिव्हरी स्टेशन्समध्ये काम करू लागले. त्यांची दमदार कामगिरी पाहून अ‍ॅमेझॉनने पूर्ण क्षमतेचे डिलिव्हरी स्टेशन त्याच्यासाठी सुरू केले. या स्टेशनचा पूर्ण कारभार आता कर्णबधिर साहाय्यक पाहतात.

Web Title:  For the first time in the country 'Silent Delivery Station'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.