मुंबई- राफेलच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काही विरोधी पक्ष राफेलवरून भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करत होते. त्यांना देशातील सर्वात मोठ्या सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतल्या एका खासगी टीव्ही चॅनेल कार्यक्रमात बोलत होते. राफेल करारात पूर्णतः पारदर्शकता असून तो प्रामाणिकपणे झालं आहे. आमच्या देशात असं होईल, चार वर्षांपूर्वी याचा कोणीही विचार केलेला नव्हता, असंही मोदींनी सांगितलं आहे.1984च्या शीख विरोधी दंगलीमध्ये काँग्रेस नेता सज्जन कुमार याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शीख दंगलीवर प्रतिक्रिया दिली आहे. चार वर्षांपूर्वी 1984च्या शीख दंगलीतील आरोपींना शिक्षा होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. जनतेला आता न्याय मिळू लागला आहे.दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार याला काल 1984मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणात दोषी ठरवले होते.दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्याने सज्जन कुमार यांना जन्मठेप सुनावण्यात आली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात अगुस्ट वेस्टलँड प्रकरणाचाही उल्लेख केला आहे. चार वर्षांपूर्वी कोणाला वाटलं नव्हतं की, अगुस्टा वेस्टलँड प्रकरणात ख्रिश्चियन मिशेल भारताच्या तुरुंगात असेल.
राफेलवरून भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना पहिल्यांदाच न्यायालयानं फटकारले- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 1:14 PM
राफेलच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
ठळक मुद्देराफेलच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काही विरोधी पक्ष राफेलवरून भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करत होते. देशातील सर्वात मोठ्या सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेसला फटकारलं आहे.