चित्रदृष्टी मराठी चित्रपट महोत्सव पहिल्यांदाच नवी मुंबईत

By Admin | Published: February 18, 2015 12:58 AM2015-02-18T00:58:03+5:302015-02-18T00:58:03+5:30

प्रत्यक्षात भेट व्हावी, सोबतच दर्जेदार असे मराठी चित्रपटही रसिकांना कलाकारांसोबत अनुभवण्याची व त्यांच्याशी हितगुज करण्याची संधी नवी मुंबईतील प्रेक्षकांना मिळणार आहे.

For the first time in Navi Mumbai, for the first time, Marathi Film Festival | चित्रदृष्टी मराठी चित्रपट महोत्सव पहिल्यांदाच नवी मुंबईत

चित्रदृष्टी मराठी चित्रपट महोत्सव पहिल्यांदाच नवी मुंबईत

googlenewsNext

नवी मुंबई : चित्रपटातील कलाकार फक्त पडद्यावरच पाहता येतात, मात्र प्रेक्षकांना त्याच चित्रपटातील आवडत्या कलाकारांची प्रत्यक्षात भेट व्हावी, सोबतच दर्जेदार असे मराठी चित्रपटही रसिकांना कलाकारांसोबत अनुभवण्याची व त्यांच्याशी हितगुज करण्याची संधी नवी मुंबईतील प्रेक्षकांना मिळणार आहे. निमित्त आहे, वाशी येथे आयोजित केलेल्या चित्रदृष्टी या मराठी चित्रपट महोत्सवाचे.
मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा, नवी मुंबईतील प्रेक्षकांना आवडत्या कलाकारांशी हितगुज करता यावे, याकरिता नवी मुंबई कला प्रबोधिनीच्यावतीने मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये २६,२७ आणि २८ फेब्रुवारीदरम्यान सकाळी १० ते रात्री १० पर्यंत हा महोत्सव भरविण्यात आला आहे. चित्रपट महोत्सवात रेगे, जयजयकार, अवताराची गोष्ट, बाबांची शाळा, ७ रोशन व्हिला, ब्लॅक बोर्ड, एक तारा, काकण, व्हॉट अबाऊट सावरकर असे १० चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या महोत्सवात चित्रपटातील सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार आणि तंत्रज्ञान विभागातील प्रमुख यांच्यासमवेत चित्रपट बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. यामुळे एक वेगळाच अनुभव या महोत्सवाच्या निमित्ताने प्रेक्षकांना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पनवेल,उरणमधील प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर महोत्सवाला भेट देणार आहेत. महोत्सवाच्या समारोपाला विविध विभागांतील चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अमेय खोपकर, अभिजित पानसे, रत्नकांत जगताप, अभिनेता जयवंत वाडकर, संतोष जुवेकर हे चित्रपट महोत्सवाच्या मार्गदर्शक समितीवर आहेत. या चित्रपट महोत्सवाच्या प्रवेशिका मनसे मध्यवर्ती कार्यालय वाशी, सिनेमॅक्स वाशी, मेक्सेस सिनेमागृह नेरूळ, विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे मोफत उपलब्ध असल्याचे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सांगितले.
अशाप्रकारचा महोत्सव नवी मुंबईत प्रथमच होत असल्याने प्रेक्षकांना एक प्रकारे मेजवानीच ठरेल, तसेच वेगवेगळ्या विषयांवरील दर्जेदार चित्रपट तेसुद्धा त्या संबंधित कलाकारांबरोबर प्रेक्षकांना बघता येतील. प्रेक्षक आपले विचार या ठिकाणी व्यक्त करू शकतात, असे प्रबोधिनीचे अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले. यावेळी अभिनेता संतोष जुवेकर, जयवंत वाडकर, समितीचे सदस्य, पदाधिकारीआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

च्चित्रपट संपल्यानंतर कलाकारांविषयीचे मत, विविध प्रश्न आणि हितगुज प्रेक्षकांना करता येणार आहे. बदलते मराठी चित्रपटाचे स्वरूप, प्रसिद्धी, चित्रपटात हाताळल्या जाणाऱ्या वैविध्यपूर्ण विषयांवर जाणकारांचे चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यामुळे दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार आणि तंत्रज्ञांसमवेत चित्रपट बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Web Title: For the first time in Navi Mumbai, for the first time, Marathi Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.