रस्ते घोटाळ्यात प्रथमच कंत्राटदार जेरबंद

By admin | Published: July 14, 2016 03:49 AM2016-07-14T03:49:20+5:302016-07-14T03:49:20+5:30

रस्ते घोटाळा प्रकरणात १० लेखा परीक्षक आणि दोन पालिका अभियंत्यासह आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ या प्रकरणात पसार असलेल्या सहा कंत्राटदारांपैकी एकाला बुधवारी

For the first time in the road scam, the contractor is seized | रस्ते घोटाळ्यात प्रथमच कंत्राटदार जेरबंद

रस्ते घोटाळ्यात प्रथमच कंत्राटदार जेरबंद

Next

मुंबई : रस्ते घोटाळा प्रकरणात १० लेखा परीक्षक आणि दोन पालिका अभियंत्यासह आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ या प्रकरणात पसार असलेल्या सहा कंत्राटदारांपैकी एकाला बुधवारी आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. दीपन प्रवीणचंद्रा शहा असे अटक कंत्राटदाराचे नाव असून, तो रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्चरचा डायरेक्टर आहे.
रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्चर ही खासगी कंपनी असून, २००६ पासून कार्यरत आहेत. दोन ते तीन राज्यांत त्यांचे प्रोजेक्ट सुरूआहे. या कंपनीचे शेअर कॅपिटल १५ कोटींच्या घरात आहे. या कंपनीचे पाच डायरेक्टर आहेत. दीपन शहा हे ३ मार्च २००८ पासून या ठिकाणी डायरेक्टर पदावर आहेत. २०१३ साली दीपन शहा यांना मुंबई महापालिकेने तब्बल ६०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे दिली. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी रेलकॉनवर होती. मात्र, मुलुंड आणि पश्चिम उपनगरातील काही रस्ते रेलकॉनमुळे जैसे थे परिस्थितीतच राहिले. या प्रकरणी अनेकदा तक्रार करूनदेखील दुर्लक्ष झाल्याने या प्रकरणाची चौकशी झाली. या चौकशीत रस्ते घोटाळ्याचे बिंग फुटले.
या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेल्या रेलकॉन कंपनीच्या शहा बरोबरच के. आर. कन्स्ट्रक्शन, आर. के. मदानी कन्स्ट्रक्शन, जे. कुमार. कन्स्ट्रक्शन, आर. पी. शहा कन्स्ट्रक्शन्स आणि महावीर कन्स्ट्रक्शन्सचे संचालकांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत लपून बसलेल्या कंत्राटदारांपैकी दीपन शहा बुधवारी पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करत न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: For the first time in the road scam, the contractor is seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.