Video: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 09:24 AM2020-08-06T09:24:35+5:302020-08-06T09:46:11+5:30
खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार वाय बी चव्हाण सेंटरमधून रात्री बाहेर पडले. कारमधून जात असताना त्यांनी रस्त्यावरील पाणी पाहून फेसबूक लाईव्ह केले.
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने मुंबईतील46 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. उंचा लाटा आणि पावसामुळे मुंबईतील मंत्रालयाबाहेर कधी नव्हे ते पाणी साचले. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रालयासमोर आयुष्यात पहिल्यांदाच एवढे पाणी पाहतोय, अशी प्रतिक्रिया दिली.
खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार वाय बी चव्हाण सेंटरमधून रात्री बाहेर पडले. कारमधून जात असताना त्यांनी रस्त्यावरील पाणी पाहून फेसबूक लाईव्ह केले. यावेळी सुळे यांनी मंत्रालयासमोरील पाणी म्हणजे समुद्र झालाय, असे म्हटले. यानंतर एवढ्या पावसात कधी एवढे पाणी तुंबले नव्हते, असे म्हणताच शरद पवारांनी पहिल्यांदा आयुष्यात या भागात एवढे पाणी पाहतोय अशी प्रतिक्रिया दिली.
46 वर्षांचा रेकॉर्ड तोडला
बुधवारी दिवसभरात मुंबईला पावसाने झोडपल्याने 46 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. कुलाब्यामध्ये 12 तासांत 294 मिमी पाऊस झाला. तर दक्षिण मुंबईतही रस्त्यांवर पाणी आले होते. ऑगस्टमध्ये कुलाब्यात 1974 मध्ये मुसळधार पाऊस झाला होता. हे रेकॉर्ड 262 मिमी होते. बुधवारी मुंबईत ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
बुधवारी सकाळी मुंबईत बऱ्यापैकी पाऊस बरसत होता. दुपारी मात्र पावसाने उघडीप घेतली. मात्र दुपारी ३ वाजता मुंबईत वेगाने वारे वाहू लागले. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणारे वारे, जोरदार मारा करणाºया जलधारांनी मुंबईकरांना झोडपून काढले. वाºयाच्या वेगाने दाखल झालेल्या पावसाने तब्बल रात्री ७ वाजेपर्यंत मुंबईला पावसाने तुफान झोडपून काढले. या काळात मुंबईत सर्वत्र ताशी ९० किमी वेगाने वारे वाहिले. त्यामुळे विशेषत: दक्षिण मुंबई परिसरात झाडे मुळासकट उन्मळून कोसळल्याची घटना घडल्या. पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली, अशी माहिती महापलिकेने दिली.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
Posted by Supriya Sule on Wednesday, 5 August 2020
अन्य़ महत्वाच्या बातम्या...
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...
कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू
आजचे राशीभविष्य - 6 ऑगस्ट 2020; वृश्चिक, कर्क राशीला मतभेद, नुकसानीचा धोका
राफेलनंतर शक्तीशाली, सशस्त्र ड्रोन मिळणार; अमेरिका 450 किलोंचे बॉम्बही देणार
Xiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला
राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार
लक्झरी कार 'Porsch 911' घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले; थेट जेलमध्ये रवानगी झाली
शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार