विष्णू वाघांनी पहिल्यांदा डोळे किलकिले केले - डॉक्टर
By admin | Published: August 25, 2016 10:05 PM2016-08-25T22:05:25+5:302016-08-25T22:05:25+5:30
गेल्या सात दिवसांपासून मुंबईच्या ‘हिंदुजा’मध्ये दाखल करण्यात आलेल्या आमदार विष्णू वाघ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरही अचंबित झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.२५ - गेल्या सात दिवसांपासून मुंबईच्या ‘हिंदुजा’मध्ये दाखल करण्यात आलेल्या आमदार विष्णू वाघ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरही अचंबित झाले आहेत.
‘आज पहिल्यांदाच वाघ यांनी डोळे किलकिले केले,’ अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणा:या डॉक्टर पथकाच्या सूत्रंनी ‘लोकमत’ला दिली. विष्णू अशी हाक मारताच त्यांनी डोळे किलकिले करून सकारात्मक प्रतिसाद दिला, हे एक चांगले सुचिन्ह, ‘गुड साईन’ असे त्या डॉक्टरांनी सांगितले.
हे जरी सकारात्मक चिन्ह असले तरी त्यातून परिस्थिती पुढे कसे वळण घेईल, त्यांची प्रकृती निश्चित प्रतिसाद द्यायला नक्की किती वेळ घेईल हे आम्हाला सांगता यायचे नाही, असे या सूत्रंनी सांगितले. वाघ यांना हिंदुजात दाखल केल्यानंतर डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीत कोणताही बदल जाणवला नव्हता; परंतु आजच्या घटनेमुळे काही बदल डॉक्टरांना जाणवले.