Join us

पहिले वृक्षलागवड संमेलन महाराष्ट्रात, रविवारी उद्घाटन, ईशा फाउंडेशनच्या जग्गी वासुदेव यांची उपस्थिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 4:42 AM

देशातील पहिले वृक्षलागवड संमेलन महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले असून, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली आणि ईशा फाउंडेशनचे संस्थापक, जग्गी वासुदेव यांच्या उपस्थितीत रविवारी १७ सप्टेंबर २०१७ रोजी राजभवन येथे या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

मुंबई : देशातील पहिले वृक्षलागवड संमेलन महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले असून, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली आणि ईशा फाउंडेशनचे संस्थापक, जग्गी वासुदेव यांच्या उपस्थितीत रविवारी १७ सप्टेंबर २०१७ रोजी राजभवन येथे या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.वृक्षलागवडीला व्यापक लोकचळवळ निर्माण करण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून, ‘वृक्षलागवड संमेलन’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशा प्रकारचे हे पहिले संमेलन आहे. या संमेलनात ईशा फाउंडेशनचे स्वयंसेवक ‘साउंड्स आॅफ ईशा’ हा कार्यक्रम सादर करतील. नंतर उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण आणि ‘रॅली फॉर रिव्हर’ या विषयावर एकत्रित काम करण्याचे प्रतीक म्हणून, मानवी भिंत तयार केली जाईल. वाळूचा वापर करून सादरीकरण करणारे कलावंत या वनमहोत्सवात कलाकृती सादर करतील. ‘वृक्षलागवड’ आणि ‘रॅली फॉर रिव्हर’ या दोन विषयांच्या अनुषंगाने शपथ दिली जाईल.राजभवन येथे होणाºया या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, भारतरत्न सचिन तेंडुलकर, शायना एन. सी, मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्यासह राज्यातील उद्योगपती, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील.

टॅग्स :महाराष्ट्र सरकारसुधीर मुनगंटीवार