पहिली लाट ज्येष्ठांच्या तर दुसरी लाट तरुणांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:07+5:302021-06-10T04:06:07+5:30

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तीव्रतेपेक्षा दुसरी लाट अधिक धोक्याची ठरली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आक्सिजन आणि खाटांच्या कमतेरतेमुळे ...

The first wave is on the lives of the elders and the second wave is on the lives of the youth | पहिली लाट ज्येष्ठांच्या तर दुसरी लाट तरुणांच्या जीवावर

पहिली लाट ज्येष्ठांच्या तर दुसरी लाट तरुणांच्या जीवावर

Next

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तीव्रतेपेक्षा दुसरी लाट अधिक धोक्याची ठरली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आक्सिजन आणि खाटांच्या कमतेरतेमुळे यावर मात करणे अधिक जिकरीचे ठरले, परंतु आता राज्यासह मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण ज्येष्ठ नागरिक गटातील होते, तर दुसऱ्या लाटेत तरुणांना अधिक संसर्ग झाल्याचे दिसून आले.

मुंबईसह राज्य गेल्या १४ महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीविरुद्ध लढा देत आहेत. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला म्हणजे पहिल्या लाटेत तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक राहिले. त्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक धोका हा ज्येष्ठांना असल्याचे सांगितले जात होते. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या तिशीतील तरुणांचे बळी गेले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली, मात्र आता ही लाट ओसरत असून तिसऱ्या संभाव्य लाटेच्या दृष्टिकोनातून यंत्रणा सज्ज होत आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, सध्या लसीकऱणाचा वेग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाटही आता स्थिरावत आहे. मात्र नागरिकांनी गाफील राहू नये. अनलॉक सुरू झाल्यानंतरही आता घराबाहेर पडताना शारीरिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे.

कोरोना पॉझिटिव्ह

वयोगट पहिली लाट दुसरी लाट

० ते १० ६७,११० ८७,६४३

११ ते २० १२९७४० २२२२८२

२१ ते ३० ३२३२८९ ५७७४१६

३१ ते ४० ४१०७९२ ७१७४४७

४१ ते ५० ३४८९९५ ५६७५१५

५१ ते ६० ३१५१३४ ४४१३०२

६१ ते ७० २१४४०८ ३०६५८९

७१ ते ८० १०२६९९ १४८३१७

८१ ते ९० २९०११ ४२५४७

९१ ते १०० ३६९३ ६३७४

तिसरी लाटेच्या प्रतिबंधासाठी तयारी

जुलै अखेरीस वा सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून आतापासूनच खबरदारी घेणे सुरू आहे. कोरोना रुग्णांत पहिल्या लाटेत २ ते ३ टक्के आणि दुसऱ्या लाटेत ७ ते ८ टक्के मुलांचे प्रमाण राहिले. तिसऱ्या लाटेत हे प्रमाण १२ ते १५ टक्के राहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेत ९० टक्के बालकांना लक्षणे नसल्याची आणि सौम्य लक्षणे असल्याचा अंदाज आहे.

Web Title: The first wave is on the lives of the elders and the second wave is on the lives of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.