जूनच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालये सुरू होणार, विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 04:10 AM2019-05-13T04:10:13+5:302019-05-13T04:10:28+5:30

महाविद्यालयांचे २०१९-२० शैक्षणिक वर्ष ६ जूनपासून सुरू होणार आहे. दरवर्षीपेक्षा १२ दिवस आधीच हे शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचा निर्णय नुकताच विद्वत परिषदेच्या बैठकीत झाला.

In the first week of June, the colleges will start, the Vidyut Council's meeting will decide | जूनच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालये सुरू होणार, विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय

जूनच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालये सुरू होणार, विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय

Next

मुंबई : महाविद्यालयांचे २०१९-२० शैक्षणिक वर्ष ६ जूनपासून सुरू होणार आहे. दरवर्षीपेक्षा १२ दिवस आधीच हे शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचा निर्णय नुकताच विद्वत परिषदेच्या बैठकीत झाला. या निर्णयामुळे सुट्टीचा कालावधी कमी झाल्याने प्राध्यापकांत नाराजीचे वातावरण आहे.
शैक्षणिक वेळापत्रक जाहीर होत असले, तरी त्याचे पालन करण्यात कॉलेजांना अडचणी येत होत्या. मात्र, आता हा त्रास होणार नसून, सर्वसमावेशक विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. प्राध्यापकांच्या मागणीनुसार सत्रांची सुरुवात २४ जूनपासून सुरू होणार होते. मात्र, महाविद्यालये दरवर्षीपेक्षा लवकर सुरू होणार असल्याचे जाहीर होताच, प्राध्यापकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विद्वत परिषदेच्या निर्णयानुसार नव्या वेळापत्रकनुसार प्रत्येक सत्राला ९० शैक्षणिक दिवस मिळणार आहेत. या वेळापत्रकाप्रमाणे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे पहिले सत्र ६ जून ते २४ आॅक्टोबर असणार आहे. या सत्रात १०८ शैक्षणिक दिवस असतील. यातील ९० दिवस शिकविण्याचे तर उर्वरित १८ दिवस हे परीक्षांसाठी असतील. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार विद्यापीठाने यंदाच्या वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक तयार केले आहे. दुसरे सत्र १३० दिवसांचे असून ते १५ नोव्हेंबर ते २ मेपर्यंत असणार आहे. पहिल्या सत्रात सणांचा कालावधी असल्यामुळे कमी शैक्षणिक दिवस मिळत असल्याचे विद्वत परिषदेतील सदस्यांनी सांगितले.

सुट्ट्यांचा कालावधी
गणपती सुट्टी २ ते ७ सप्टेंबर
दिवाळी सुट्टी २५ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबर
ख्रिसमस सुट्टी २६ डिसेंबर ते १ जानेवारी
उन्हाळी सुट्टी ३ मे ते ७ जून

सत्र कालावधी
पहिले सत्र ६ जून ते २४ आॅक्टोबर
दुसरे सत्र १५ नोव्हेंबर ते २ मे

Web Title: In the first week of June, the colleges will start, the Vidyut Council's meeting will decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.