मुंबई : चेंबूर येथील इंडियन ऑइल नगरचा विवंता पेट्रोलपंप हे महिला सबलीकरणाचे उत्तम उदाहरण आहे. हा पेट्रोलपंप मुंबईतील पहिला महिला पेट्रोलपंप इंडियन ऑइलचे संचालक (विपणन) गुरमित सिंग यांनी जाहीर केला होता. देशभरात एकूण ८३ पेट्रोलपंप पूर्णपणे महिला चालवत आहेत.
या पेट्रोलपंपवर जनरल शिफ्टला सर्व महिला कामगार आहेत. सर्व महिला काम करणारा हा मुंबईतील पहिला पेट्रोलपंप आहे.
गुरमित सिंग म्हणाले की, सर्व महिलांचा पेट्रोलपंप सुरू केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. ही सर्वांना समान संधीची वचनपूर्ती आहे. महिलांना नव्या मार्गाने संधी देण्यात आली आहे. यावेळी सूत्रसंचालक अनघा मोडक, उद्योजक मनीषा मराठे यांचा गुरमित सिंग यांनी सत्कार केला तसेच याप्रसंगी पेट्रोलपंपमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे अनावरण करण्यात आले. महिलांना केवळ रोजगार उपलब्ध करून न देता त्यांना आरोग्य आणि स्वच्छतेच्या सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.