पदवी अभ्यासक्रमांचे प्रथम वर्ष प्रवेश

By admin | Published: May 26, 2016 01:25 AM2016-05-26T01:25:54+5:302016-05-26T01:25:54+5:30

मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे.

First year admission in degree courses | पदवी अभ्यासक्रमांचे प्रथम वर्ष प्रवेश

पदवी अभ्यासक्रमांचे प्रथम वर्ष प्रवेश

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करता येणार आहे.
यासंबंधीचे परिपत्रक जूनच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. विद्यापीठाचे जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव लीलाधर बनसोड यांनी सांगितले की, मुंबई विद्यापीठामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणीच्या यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. यासंबंधीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाईल. विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून मुंबई विद्यापीठाने कला, वाणिज्य आणि विज्ञान या विद्याशाखांतील अभ्यासक्रमांसाठी आॅनलाइन नोंदणी अनिवार्य केली आहे. (प्रतिनिधी)

मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमधील प्रवेश क्षमता-
कला - ५५ हजार ८४१
वाणिज्य - १ लाख ३९ हजार ७३०
विज्ञान - ६१ हजार ०२०

Web Title: First year admission in degree courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.