Join us

आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्रमाला या, संजय निरुपम यांचे राज ठाकरेंना आवाहन   

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 1:13 PM

उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.

ठळक मुद्दे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी  उत्तर भारतीयांची माफी मागावी मनसेकडून उत्तर भारतीयांना होणारी मारहाण आणि त्यांना देण्यात येणाऱ्या हीनतेच्या वागणुकीप्रकरणी राज ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे२ डिसेंबर रोजी होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वीकारले आहे

मुंबई - उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी  उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.  मनसेकडून उत्तर भारतीयांना होणारी मारहाण आणि त्यांना देण्यात येणाऱ्या हीनतेच्या वागणुकीप्रकरणी राज ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे, असे निरुपम यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचे निमंत्रण स्वीकारल्याने निरुपम यांनी समाधान व्यक्त केले आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वीकारले आहे. कांदिवलीतील भुराभाई हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामधून राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमातील उत्तर भारतीयांच्या संभाव्य उपस्थितीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय निरुपम म्हणाले की, "राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यापूर्वी त्यांनी माफी मागितली पाहिजे. मनसेकडून उत्तर भारतीयांना मारहाण होत असते. तसेच त्यांना हीनतेची वागणुकही दिली जात असते, त्यामुळे या प्रकारांसाठी राज ठाकरे यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितल्यास उत्तर भारतीय समाज त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारेल,"  उत्तर भारतीयांवर कायम टीका करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे आता उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण राज ठाकरेंना देण्यात आलं होतं. हे निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारलं आहे. 2 डिसेंबर रोजी कांदिवलीच्या भुराभाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात राज ठाकरे यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमातून राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधतील. उत्तर भारतीय महापंचायतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

परप्रांतीयांचे लोंढे, त्यामुळे सोयी-सुविधांवर पडणारा ताण, फेरीवाल्यांच्या समस्या यावरुन राज ठाकरेंनी अनेकदा उत्तर भारतीयांवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसे स्टाईल राड्याचा फटका आतापर्यंत अनेकदा उत्तर भारतीयांना बसला आहे. मात्र आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. 2 डिसेंबरला हा कार्यक्रम कांदिवलीत होणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण राज यांना 12 ऑक्टोबरला देण्यात आलं होतं. हे निमंत्रण राज यांनी स्वीकारल्याचं वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. 

परप्रांतीयाच्या मुद्यावरुन अनेकदा राज ठाकरे उत्तर भारतीयांवर बरसले आहेत. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा उत्तर भारतीयांना मारहाणदेखील केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा एक गट गेल्या महिन्यात राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेला होता. त्यावेळी त्यांनी राज यांना डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. 'उत्तर भारतीयांच्या मुद्यावर राज ठाकरेंनी त्यांचे विचार मांडावेत. यामुळे अनेक गैरसमज दूर होतील,' असा विश्वास उत्तर भारतीय महापंचायतीचे सदस्य विनय दुबे यांनी यांनी राज यांना निमंत्रणपत्रिका दिल्यावर व्यक्त केला होता. 

टॅग्स :संजय निरुपमराज ठाकरेराजकारणमुंबईमनसेकाँग्रेस