मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नुकसानभरपाई जाहीर करणार - मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:06 AM2021-05-19T04:06:42+5:302021-05-19T04:06:42+5:30
मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ...
मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मंगळवारी तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मालाड-मढ, खारदांडा, माहीम व कुलाबा आदी मुंबईच्या किनारपट्टीवरील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
यावेळी शेख म्हणाले की, या चक्रीवादळामुळे मच्छीमार नौका, जाळी व किनारपट्टीनजीकची घरे यांचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याकडून तौक्ते वादळाची पूर्वसूचना मिळाल्यानंतर मच्छीमारांनी आपल्या नौका नांगरून ठेवल्या होत्या. तरीही वादळाच्या तीव्रतेमुळे बोटींचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मदत जाहीर करण्यात येईल. यावेळी त्यांच्यासोबत आमदार भाई जगताप, मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, सहसचिव राजेंद्र जाधव, प्रादेशिक उपायुक्त कोकण विभाग देवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-----------------------------------