राजकारणामुळे मच्छीमार संकटात
By admin | Published: November 26, 2014 10:49 PM2014-11-26T22:49:55+5:302014-11-26T22:49:55+5:30
मच्छीमारांमधील राजकीय फाटाफुटीमुळेच त्यांचे हद्द निश्चिती, डिङोलचा परतावा इलेक्ट्रॉनिक वजन काटय़ाचा प्रश्न प्रलंबित राहिले आहेत.
Next
वसई/पालघर : मच्छीमारांमधील राजकीय फाटाफुटीमुळेच त्यांचे हद्द निश्चिती, डिङोलचा परतावा इलेक्ट्रॉनिक वजन काटय़ाचा प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे या समाजाने आपले प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय हेवेदावे दूर ठेवावेत अशी मागणी आता समाजातील तरुण पिढी करू लागली आहे.
मच्छीमारांमध्ये शेकापचा प्रभाव असलेली उरण, कारंजा येथील लॉबी तसेच शिवसेनेचे नेते अनंत तरे यांचे वर्चस्व मानणारी लॉबी आणि सहकारी संस्थांच्या संघटनांचे वर्चस्व असणारी वसई-पालघरची लॉबी असे तीन राजकीय प्रवाह आहेत. त्यांच्यात अंतर्गत संघर्ष असल्यामुळे एकाच्या अडचणीत दुसरा धावून जात नाही. ससून डॉकमध्ये इलेक्ट्रॉनिक काटय़ाचा जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याबाबत वेसावे आणि वसई-पालघर, ठाणो येथील मच्छीमार उदासीन आहेत. कारण ससून डॉकमध्ये विकायला येणारी मासळी कारंजा, उरण
येथून मोठय़ा प्रमाणात येते, व
त्यांची राजकीय संलगAनता शेकापशी आहे.
ज्या वेळी अनंत तरे हे आमदार होते त्यावेळी त्यांनी राजकीय भेदाभेद दूर ठेवून वसईनजीकच्या पाचूबंदर येथील जेटीवरील मत्स्य खरेदी-विक्री करणा:या विक्रेत्यांवर धाडी घालून त्यांच्या वजन काटय़ांची तपासणी केली होती. तेव्हा खरेदीसाठी वापराला जाणारा ताणकाटा अथवा तोलाईचा तराजू वेगळा आणि खरेदी केलेली मासळी विक्री करण्यासाठी वापरायचा ताणकाटा अथवा तराजू वेगळा असा प्रकार आढळून आला.
मासे खरेदी व विक्रीसाठी वापरल्या जाणा:या दोनही तराजूची तपासणी केली असता खरेदीच्या तराजूत 4क् किलोच्या मच्छीमागे अंदाजे चार ते पाच किलो मच्छी जास्त भरावी लागत होती आणि हिच मच्छी विक्रीच्या तराजूत टाकली असता ती चार ते पाच किलो जास्त भरत होती. याबाबतच्या तक्रारी पोलिसात व वैधमापन खात्याच्या कार्यालयात दाखलही करण्यात आल्या होत्या. परंतु मच्छीमारांचे शोषण करणा:या दलालांना आणि व्यापा:यांना रायगड जिल्ह्यातील राजकीय दबंगांचे संरक्षण मिळाले. म्हणजे ज्यांचा आश्रय मच्छीमारांना त्यांचा आश्रय मच्छीमारांना लुटणा:यांनाही अशी परस्परविरोधी अवस्था ओढावली. त्यात जीत लुटारुंची झाली. पोलीस वैधमापन खात्याचे अधिकारी कधीही मच्छीमारांची बाजू घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे फावते.
अनेकदा तक्रारी केल्या तरी कुठेही दखल घेतली जात नाही. म्हणूनच मच्छीमारांना शेवटी ससून डॉक मध्ये मच्छी न आणण्याचे अस्त्र उगारावे लागले आहे. परंतु या संघर्षात रायगडातील पुढा:यांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे कोणताही लोकप्रतिनिधी आणि राज्यातील नवे सरकार लक्ष घालण्यास तयार नाही. त्यामुळे हे आंदोलन कितीही दिवस चालले तरी, निष्फळ ठरण्याची शक्यता आहे. कारण वेसावे, वसई, डहाणू, पालघर येथील मार्केटमध्ये पुरेशी मच्छी मिळत असल्याने ससून डॉकमध्ये मच्छी आली काय आणि नाही काय? याचे सुख-दु:ख कोणलाच नाही. त्यामुळे बिचा:या मच्छीमारांचा धीर हळूहळू सुटू लागला आहे. (विशेष प्रतिनिधी)