सागरी सर्वेक्षणा विरोधात मच्छीमार करणार आंदोलन?
By admin | Published: February 1, 2015 11:39 PM2015-02-01T23:39:11+5:302015-02-01T23:39:11+5:30
तेल व नैसर्गिक वायू महामंडळातर्फे समुद्रामध्ये सुरु असलेल्या सर्वेक्षणाविरोधात वसई ते थेट सातपाटी पट्ट्यात मासेमारी
वसई : तेल व नैसर्गिक वायू महामंडळातर्फे समुद्रामध्ये सुरु असलेल्या सर्वेक्षणाविरोधात वसई ते थेट सातपाटी पट्ट्यात मासेमारी करणाऱ्या मच्छिमार समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्या विरोधात लवकरच आंदोलन होण्याची शक्यता आहे. हे सर्वेक्षण टप्प्याटप्प्याने होणार असून ठिकठिकाणी मासेमारी बंद ठेवावी लागणार आहे. या निर्णया विरोधात मच्छिमार स्वराज्य समिती आंदोलनाच्या तयारीत आहेत. महामंडळातर्फे सध्या भर समुद्रात तेल संशोधनासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. . याकाळात स्थानिक मच्छिमारांची मासेमारी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे मच्छिमारांमध्ये असंतोष खदखदत आहे. सर्वेक्षण सुरु झाले असले तरी त्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात महामंडळाने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे मत्स्यव्यवसाय आयुक्तांनीही नुकसान भरपाई संदर्भात विचारणा केली नाही . अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे मच्छिमारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.