मुंबई - वर्सोवा विरार या सागरी पुलामुळे वर्सोवा विरार किनाऱ्यालगतच्या मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार आहे, असे सांगत कोळी बांधवांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. सर्वेक्षणासाठी अधिकारी आल्यास पुन्हा त्यांना हुसकावून लावू, असा निर्धार स्थानिक मच्छीमारांनी केला आहे.
एमएमआरडीएकडून वर्सोवा ते विरार हा ४२.७५ किमी लांबीचा सागरी पूल उभारला जाणार आहे. मात्र या पुलाच्या बांधकामामुळे मच्छीमारांचा व्यवसाय गोत्यात येणार असल्याने स्थानिक मच्छीमारांनी या बांधकामाला विरोध केला आहे.
या प्रकल्पासाठी समुद्रात करण्यात येणाऱ्या बांधकामामुळे मच्छीमारी व्यवसायाला फटका बसणार आहे. समुद्रात बोटी घेऊन जाताना व बाहेर आणताना त्रासदायक ठरणार आहे त्यामुळे लवकरच या संदर्भात सर्व मच्छीमारांची बैठक घेण्यात येणार असून पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे.- संतोष कोळी, अध्यक्ष, मढ दर्यादीप मच्छीमार सहकारी सोसायटी
मच्छीमारांची मनधरणीप्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरू असून पुन्हा एकदा मच्छीमारांची मनधरणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वेक्षण करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, तसेच या पुलाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे पुनर्विलोकन करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.