‘सी-वॉर’साठी मच्छिमार समुद्रात

By admin | Published: October 24, 2015 11:01 PM2015-10-24T23:01:02+5:302015-10-24T23:01:02+5:30

वाद पर्ससीनचा : पोलिसांकडून शांततेचे आवाहन

Fishermen for 'Sea War' in the sea | ‘सी-वॉर’साठी मच्छिमार समुद्रात

‘सी-वॉर’साठी मच्छिमार समुद्रात

Next


मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पुन्हा शेकडोंच्या संख्येने परराज्यांतील हायस्पीड ट्रॉलर्स धुमाकूळ घालत मासळीची लयलूट करीत आहेत. हायस्पीड ट्रॉलर्सनी ३५ ते ४० मच्छिमारांच्या मासेमारीस टाकलेल्या जाळ्यांचे ६० लाखांहून अधिक नुकसान केले आहे. त्यामुळे या हायस्पीडना परतवून लावण्यासाठी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही मच्छिमार आज, रविवारी समुद्र्रातच हल्लाबोल आंदोलन करणार आहोत. पोलीस प्रशासनाने स्पीड बोटीसह हत्यारबंद पोलीस बंदोबस्त द्यावा, अशा मागणीचे निवेदन मच्छिमारांनी शनिवारी मालवण पोलिसांना दिल्याने समुद्री हल्ल्याचे ढग अधिक गडद बनले आहेत.
सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर परप्रांतीय ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरू असल्याचा आरोप करीत मालवणातील ट्रॉलर्स मालक व पारंपरिक मच्छिमार एकवटले. पाच दिवसांपूर्वी मालवण सर्जेकोट बंदर येथे पार पडलेल्या मच्छिमार बैठकीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर समुद्रातच हल्ला करायचा अशी एकमुखी भूमिका घेण्यात आली होती. त्यानंतर दोन ते तीन दिवस परप्रांतीय ट्रॉलर्सचे अतिक्रमण काहीसे कमी होते. मात्र, पुन्हा समुद्री अतिक्रमण सुरू झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार समुद्री हल्ला करण्यासाठी २५ ते ३० ट्रॉलर्स सज्ज करण्यात आले आहेत. आज पहाटे समुद्रातच हल्ला करून परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सना परतवून लावायचे हा निर्धार पक्का करण्यात आला आहे. शनिवारी मालवणातील मच्छिमारांनी प्रभारी पोलीस निरीक्षक खोत यांना याबाबत निवेदन सादर केले, तर मच्छिमारांच्या जाळ्यांच्या नुकसानीची यादी भद्र्रकाली मत्स्य व्यवसाय संस्था मर्यादित, मिर्याबांद अध्यक्ष गोपीनाथ तांडेल यांनी सादर केली. (प्रतिनिधी)
मच्छिमारांचे ६० लाखांचे नुकसान
हायस्पीड ट्रॉलर्सनी संथेच्या ३५ ते ४० मच्छिमारांच्या मासेमारीस टाकलेल्या जाळ्यांचे ६० लाखांहून अधिक नुकसान केले आहे. यात प्रसाद पाटील, लवू सावजी, जयवंत केळुसकर, नारायण परुळेकर,
मुरारी सावंत, महेश पराडकर, शंकर फोंडबा, वसंत आडकर, राजेश शेलटकर, भगवान मुंबरकर, अंकुश सावजी, सुभाष लोने, कैलास मुंबरकर, शुभांगी सुर्वे, किरण आचरेकर, पुंडलिक शेलटकर, महेश देसाई, अनिल चोडणेकर, विठोबा आडकर, निवेदिता कांदळकर, संजय जामसंडेकर, विलास आडकर, जयश्री कांदळगावकर, दीपक जामसंडेकर, नारायण आडकर, श्रीराम जामसंडेकर, लक्ष्मण खडपकर, संजय सावजी, रघुनंदन खडपकर, विजयश्री तांडेल, अरुण जामसंडेकर, रोहिदास लोने, सीमा पराडकर या बोटमालकांचे सुमारे २४२ जाळ्यांचे ६० लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.
 

Web Title: Fishermen for 'Sea War' in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.