Join us

मच्छीमारांना कर्जमाफी देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 5:13 AM

मच्छिमारांना कृषी क्षेत्राचा दर्जा देऊन कर्जमाफी आणि मासेमारी साधन सामु्रगीवर जीएसटी सवलत देण्याचे आश्वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिल्याचा दावा महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीने केला आहे.

मुंबई : मच्छिमारांना कृषी क्षेत्राचा दर्जा देऊन कर्जमाफी आणि मासेमारी साधन सामु्रगीवर जीएसटी सवलत देण्याचे आश्वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिल्याचा दावा महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीने केला आहे. मच्छिमारांच्या समस्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात समितीसोबत बुधवारी झालेल्या बैठकीत जानकर यांनी आश्वासित केल्याचे समितीचे म्हणणे आहे. समितीच्या माहितीनुसार, २३ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या कृषी विभागाच्या बैठकीत जानकर समस्या मांडणार असल्याचे आश्वासन जानकरांनी दिले. राज्याच्या जलधीक्षेत्राबाहेर मच्छिमारांना व्हीटीएस यंत्रणा बसवून मासेमारी करण्याचा अधिकार नसताना परिपत्रक काढल्यामुळे सरकारने विनाशकारी मासेमारीला पळवाट दिल्याचा आरोपही समितीने केला आहे. मात्र हे परिपत्रक दोन दिवसांत रद्द करू, असे आश्वासन जानकर यांनी आम्हाला दिले आहे.