‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून आता मच्छीमारांनाही मिळणार अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 06:49 AM2019-07-28T06:49:34+5:302019-07-28T06:49:43+5:30

मच्छीमार हा सहकार आणि असहकारी संस्थेच्या माध्यमातून आपला व्यवसाय करत असतो, परंतु किसान के्रडिट कार्ड योजनेचा लाभ आता मच्छीमारांनाही मिळणार आहे.

 Fishermen will now get subsidy through 'Kisan Credit Card' scheme | ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून आता मच्छीमारांनाही मिळणार अनुदान

‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून आता मच्छीमारांनाही मिळणार अनुदान

Next

मुंबई : ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर पैसे दिले जातात. त्यातून शेतकरी शेतीसाठी लागणारी साधनसामुग्री घेतो. त्याचप्रमाणे, आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसह मच्छीमारांसाठीही किसान के्रडिट कार्ड योजनेचा लाभ देऊ केला आहे. यातून मच्छीमार मासेमारीसाठी लागणारी साधनसामुग्री घेऊन व्यवसाय करू शकतो.
करंजा मच्छीमार सोसायटीचे संचालक हेमंत गौरीकर यांनी सांगितले की, या योजनेनुसार दोन लाखांपर्यंतचे कर्ज
सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी देणे क्रमप्राप्त
आहे, असा आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. सरकारची योजना चांगली
असून, कराचा विषय शिथिल केला, तर त्याचा फायदा मच्छीमारांना होईल. मच्छीमार हा सहकार आणि असहकारी संस्थेच्या माध्यमातून आपला व्यवसाय करत असतो, परंतु किसान के्रडिट कार्ड योजनेचा लाभ आता मच्छीमारांनाही मिळणार आहे.
मत्स्यव्यवसायातील मासेमारी, मत्स्यपालन करणाºयांना किसान के्रडिट कार्ड योजनेतून अनुदान मिळणार आहे. कोळी बांधव योजनेंतर्गत मिळालेल्या रुपयांतून मारेमारीसाठी लागणारे साहित्य विकत घेऊ शकतो. मच्छीमार आपल्या जवळच्या बँकेत जाऊन या योजनेची माहिती घेऊन अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.

Web Title:  Fishermen will now get subsidy through 'Kisan Credit Card' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई