प्रस्तावित कफ परेड-नरिमन पॉइंट सागरी पुलाच्या बांधकामाला मच्छिमार संघटनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:34 AM2021-02-05T04:34:25+5:302021-02-05T04:34:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रस्तावित कफ परेड ते नरिमन पॉइंट सागरी उन्नत पुलाच्या बांधकामाला अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती ...

Fishermen's Association opposes construction of proposed Cuff Parade-Nariman Point sea bridge | प्रस्तावित कफ परेड-नरिमन पॉइंट सागरी पुलाच्या बांधकामाला मच्छिमार संघटनेचा विरोध

प्रस्तावित कफ परेड-नरिमन पॉइंट सागरी पुलाच्या बांधकामाला मच्छिमार संघटनेचा विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रस्तावित कफ परेड ते नरिमन पॉइंट सागरी उन्नत पुलाच्या बांधकामाला अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने विरोध दर्शविला आहे. स्थानिक मच्छिमारांच्या समस्यांचे निवारण जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत होणाऱ्या नियोजनाला आणि संभावित सागरी सर्व्हेला समितीचा विरोध राहणार आहे.

सदर पुलामुळे स्थानिक मच्छिमारांच्या होणाऱ्या नुकसानाबाबत विचार होणे अत्यावश्यक आहे. समुद्रातील जैविकतेचा अभ्यास करण्यात यावा. तसेच अहवाल येईपर्यंत प्रशासनाने बांधकाम करण्याची घाई टाळावी. एम.एम.आर.डी.ए प्रकल्पाची प्रस्तावना करताना कॉस्ट-टू-बेनिफिटचा अभ्यास करणार हे निश्चित आहे. परंतु त्यांनी या प्रकल्पामुळे बेनिफिट-टू-मच्छिमारांचे नुकसानाचा अभ्यास करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी सांगितले.

प्रकल्पामुळे जर मच्छिमारांच्या मासेमारी प्रक्रियेवर बंधन येत असतील किंवा नुकसान होत असतील तर प्रकल्पाला विरोध करणार याची नोंद सरकारने घ्यावी, असे तांडेल यांनी म्हटले आहे. एम.एम.आर.डी. ए. ने समितीच्या मागणीचा विचार करून मच्छिमारांबरोबर संवाद साधावा, असेही समितीने म्हटले आहे.

Web Title: Fishermen's Association opposes construction of proposed Cuff Parade-Nariman Point sea bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.