Join us

मच्छिमारांच्या जमिनी, मासे सुकवण्याच्या जागा बाधित होणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:08 AM

पालिका प्रशासन : काेस्टल राेड प्रकल्पात उदरनिर्वाहाच्या साधन व्यवस्थेवर बाधा आल्यास मोबदलालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई किनारी ...

पालिका प्रशासन : काेस्टल राेड प्रकल्पात उदरनिर्वाहाच्या साधन व्यवस्थेवर बाधा आल्यास मोबदला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे (काेस्टल राेड) काम करताना स्थानिक मच्छिमारांच्या जागा, जमिनी किंवा मासे सुकवण्याच्या जागा बाधित होणार नाहीत, याची खबरदारी प्रकल्पाचे नियोजन करतानाच घेण्यात आली आहे. तरीही मासेमारी व्यवसायावर काही परिणाम झाला किंवा त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधन व्यवस्थेवर बाधा आल्यास योग्य मोबदला देण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने केली आहे.

मुंबई महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, मासेमारी व्यवसायावर काय परिणाम होईल व त्यासाठी काय उपाययोजना आखल्या जाव्यात, यासाठी सीएमएफआरआय या संस्थेला सर्वेक्षण करून अभ्यासपूर्वक अहवाल देण्यासाठी नियुक्त केले होते. त्यांनी सुचविलेल्या पर्यायानुसार व बाधित मच्छिमारांना योग्य मोबदला मिळावा म्हणून धोरणात्मक मार्गदर्शक बाबी ठरविण्यासाठी मुंबई पालिकेने सक्षम सल्लागाराची नियुक्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. या सल्लागाराकडून सर्वेक्षणाचे काम करून बाधित लोकांना योग्य मोबदला व उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचे काम लवकरात लवकर करण्यात येईल. या प्रकल्पाच्या कामामुळे मत्स्य व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

---------------------------