अंधेरी तहसिलदार कार्यालयावर निघणार मच्छीमारांचा धडक मोर्चा; डिझेल दरवाढीचा बसला फटका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 12:55 PM2022-03-23T12:55:23+5:302022-03-23T12:55:38+5:30

केंद्र सरकार व राज्य सरकार मच्छीमारांच्या प्रश्र्नावर गंभीर नाही, त्याच्या फटका मच्छीमारांना बसत आहे.

Fishermen's strike on Andheri tehsildar's office on 24 march 2022 | अंधेरी तहसिलदार कार्यालयावर निघणार मच्छीमारांचा धडक मोर्चा; डिझेल दरवाढीचा बसला फटका  

अंधेरी तहसिलदार कार्यालयावर निघणार मच्छीमारांचा धडक मोर्चा; डिझेल दरवाढीचा बसला फटका  

googlenewsNext

मुंबई- मच्छीमारांना मिळणारे डिझेल तब्बल ३० रूपयांनी महाग झाले, त्यामुळे मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आला आहे, अनेक मासेमारी नौका बंद झाल्या आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार मच्छीमारांच्या प्रश्र्नावर गंभीर नाही, त्याच्या फटका मच्छीमारांना बसत आहे. याबाबत सरकारचे लक्ष वाढण्यासाठी वेसावे व परिसरातील सर्व मच्छीमारांची एक जाहीर सभा काल रात्री वेसावे बंदर किनाऱ्यावर झाली.

वेसावा कोळी जमात,नाखवा मंडळ तसेच येथील तिन्ही मच्छिमार सहकारी संस्था व सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थितीत तातडीने मच्छीमारांचा धडक मोर्चा अंधेरी तहसीलदार कार्यालयावर काढण्यात यावा असे एकमताने ठरविण्यात आले अशी माहिती मच्छीमार नेते प्रदिप टपके यांनी दिली. उद्या गुरुवार दि, २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अंधेरी तहसीलदार कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या धडक मोर्चात पारंपरिक वेशात  फार मोठ्या प्रमाणात मच्छीमार व कोळी महिला  सहभागी होणार आहेत.

डिझेल भाववाढीतील तफावत कमी करावी, सवलती दरात मच्छीमारांना डिझेल मिळावे, राज्य सरकारने मच्छीमारांचे थकित डिझेल परतावे तातडीने द्यावेत, एलईडी पध्दतीने होणारी मासेमारी बंद करावी, १२० अश्र्वशक्ती वरिल मच्छीमार नौकांना डिझेल पुरवठा करावा, कोळीवाडे संरक्षित करावेत इत्यादी प्रमुख मागण्यांचे निवेदन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना  देण्यात येणार आहे. या धडक मोर्चाचे नेतृत्व नाखवा मंडळ अध्यक्ष देवेंद्र काळे व वेसावे गावातील सर्व सहकारी संस्था करणार आहेत अशी माहिती पृथ्वीराज चंदी यांनी दिली.

Web Title: Fishermen's strike on Andheri tehsildar's office on 24 march 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.