पंकज राऊत, बोईसरतारापूर एमआयडीसी क्षेत्रातून सोडण्यात आलेल्या रासायनिक प्रदूषित सांडपाण्यामुळे काल (दि. २८) रात्री व आज सकाळी उच्छेकी, दांडी व नवापूर समुद्राच्या खाडीकिनारी विविध जातीचे हजारो मासे मृत्युमुखी पडले असून संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीकरीता बोलावूनही त्यांनी पाठ फिरविल्याने मच्छिमारांमध्ये संतापाची भावना असून या घटनेची गंभीर दखल न घेतल्यास मच्छिमार आंदोलनाच्या तयारीत आहेत.तारापूर औद्योगिक क्षेत्रात सध्या कार्यान्वित असलेल्या २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी)मध्ये क्षमतेपेक्षा जास्त रासायनिक पाणी येत असल्याने अतिरिक्त सांडपाणी विना प्रक्रियाच ओव्हर फ्लो होऊन नवापूरच्या समुद्रात जात असल्याने मासे मरण्याच्या घटना नेहमीच घडत असून त्याचा गंभीर परिणाम हा खाडी किनाऱ्यावरील बोय, निवटी, चिंबोरी, शिंगाळी, सरबट इ. विविध जातींच्या माशांच्या उत्पत्तीवर होत आहे व यातूनही जे मासे वाचून वाढतात ते ही असे तडफडून मरत आहेत आणि जर चुकून हे मेलेले मासे बाजारात नेऊन विकले तर त्याचाही आरोग्यावर गंभीर परिणम होण्याची शक्यता आहे.
प्रदूषित पाण्याने खाडीतील मासे मेले
By admin | Published: March 01, 2015 11:04 PM