राज्याच्या सागरी क्षेत्रात महिनाभर मासेमारीस बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:09+5:302021-06-01T04:06:09+5:30

मत्स्य व्यवसाय मंत्र्यांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी, तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी ...

Fishing banned for a month in the state's maritime area | राज्याच्या सागरी क्षेत्रात महिनाभर मासेमारीस बंदी

राज्याच्या सागरी क्षेत्रात महिनाभर मासेमारीस बंदी

Next

मत्स्य व्यवसाय मंत्र्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी, तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी १ जून ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

जून व जुलै महिन्यांत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारीस बंदी घातल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठीही ही बंदी घालण्यात आल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

विभागाने काढलेल्या आदेशानुसार, १ जूनपासून महिनाभर राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारीस बंदी असणार आहे. मात्र, ही मासेमारी बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास या नौका आणि पकडलेली मासळी जप्त करण्याचा इशारा विभागाने आदेशात दिला आहे.

.................................

Web Title: Fishing banned for a month in the state's maritime area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.