राज्याच्या सागरी क्षेत्रात 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:03 PM2021-05-31T22:03:44+5:302021-05-31T22:05:13+5:30

मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

Fishing banned in the states maritime area from June 1 to July 31said aslam shaikh | राज्याच्या सागरी क्षेत्रात 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी

राज्याच्या सागरी क्षेत्रात 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी

googlenewsNext
ठळक मुद्देकिनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागूनियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार

मुंबई : मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने काढला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे.  
 
"जून व जुलै महिन्यात मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारीस बंदी घातल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठीही ही बंदी घालण्यात आली आहे," असे अस्लम शेख यांनी सांगितले. 

यासंबंधी मत्स्य व्यवसाय विभागाने काढलेल्या आदेशानुसार, 1 जून 2021 ते 31 जुलै या कालावधीत राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन 12 सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास/केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमानुसार असे गलबत जप्त करण्यात येऊन त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच कायद्यातील अन्य तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल, असे या आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Fishing banned in the states maritime area from June 1 to July 31said aslam shaikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.