मुंबई - राज्यात शिवसेनेनं बंड केल्यानंतर देशात दोन चेहरे सर्वपरिचीत झाले ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील. बंडाच्या काळात गुवाहटीतील हॉटेलमधून आपल्या कार्यकर्त्याला फोन केल्यानंतरचं त्यांचं संभाषण चांगलच व्हायरल झालं होतं. त्यामुळे, सांगोल्याचे आमदार एका दिवसांत स्टार झाले, सोशल मीडियावर मिम्स आणि गाण्यांमधून त्यांचा डायलॉग हिट झाला. अर्थातच डायलॉग हीट झाल्यामुळे शहाजीबापू पाटील हेही हीट झाले. नेहमीच आपल्या भाषणामुळे चर्चेत असलेले बापू आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. ते म्हणजे त्याचं वजन घटल्याने.
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... या डायलॉगमुळे शहाजीबापूंचं राजकीय वजन वाढलं असलं तरी शारिरीक वजनही वाढलेलंच होतं. त्यामुळे, अनेकदा प्रवासात, संभास्थळी, गर्दीच्या ठिकाणी त्यांना त्रास व्हायचा. म्हणूनच आपलं शारिरिक वजन कमी करण्याचं मनावर घेत शहाजीबापूंनी थेट बंगळुरूतील श्री श्री श्री रविशंकर यांचं आश्रम गाठलं. हिवाळी अधिवशेनाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांनंतर शहाजीबापू पाटील अचानक गायब झाले होते. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगोल्यात जाऊन शहाजीबापू यांच्यावर टीकास्त्र डागले होते. मात्र, या टीकेलाही शहाजीबापू यांनी प्रत्युत्तर दिले नव्हते.
वजन आटोक्यात रहावे व जनसेवेसाठी आणखी जोमाने पळता यावे यासाठी बंगरुळु येथील श्री श्री रविशंकर महाराजांच्या आश्रमामध्ये पंचकर्म आणि सुदर्शन क्रियेद्वारे वजन कमी केलं असून आता एकदम फिट आणि फाईन झाल्यासारखं वाटतंय, असे शहाजीबापूंनी आता परत आल्यानंतर म्हटलं आहे. शहाजीबापू हे ९ दिवस बंगळुरुतील आश्रमात पंचकर्म आणि शारिरीक व्यायाम करण्यात व्यक्त होते.