इमान झाली फिट आणि स्लीम! डॉक्टरांनी शेअर केला व्हिडिओ
By admin | Published: April 20, 2017 01:15 PM2017-04-20T13:15:27+5:302017-04-20T13:15:27+5:30
अतिलठ्ठपणाने त्रस्त असलेली आणि गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत उपचार घेत असलेली इमान अहमद आता बऱ्यापैकी बारीक झाली असून
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - अतिलठ्ठपणाने त्रस्त असलेली आणि गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत उपचार घेत असलेली इमान अहमद आता बऱ्यापैकी बारीक झाली असून ती तंदुरुस्तही दिसत आहे. इमानवर उपचार करत असलेल्या सैफी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असलेल्या इमानचा व्हिडिओ यूट्युबवर शेअर केला आहे. याआधी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात इमानवर उपचार करत असलेल्या डॉ. लकडावाला यांनी तिच्या वजनात मोठी घट झाल्याचे सांगितले होते.
इजिप्तची नागरिक असलेल्या इमानला तिच्या अतिलठ्ठपणावर उपचार करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये भारतात आणण्यात आले होते. त्यावेळी इमानचे वजन 500 किलोहून अधिक होते. त्यानंतर तिचे वजन कमी करण्यासाठी मार्चमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिच्या वजनात 250 किलोहून अधिक घट झाली.
बऱ्यापैकी फिट झालेल्या इमानचा व्हिडिओ सैफी रुग्णालयातील डॉक्टरांनी शेअर केला असून, त्यात इमान आधीपेक्षा अधिक तंदुरुस्त झाल्याचे दिसत आहे. इमान आता बऱ्यापैकी तंदुरुस्त झाली आहे. ती आता व्हिलचेअऱवर बसू शकते. तसेच बराच काळ बसून राहणेही तिला शक्य होत आहे. मात्र तीन महिन्यांपूर्वी आम्हाला हे अशक्यप्राय वाटत होते. असे इमानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक असलेल्या डॉ. अपर्णा गोविल यांनी सांगितले.